नदी प्रदूषण व्यवस्थापनासाठी कंपनीचा प्रस्ताव

ग्रामीण भागातील पर्यावरणीय गंभीर समस्या रोखण्यासाठी जिल्ह्यात सांडपाणी, घनकचरा आणि नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कंपनी स्थापनेचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
Company proposal for river pollution management
Company proposal for river pollution management
Published on
Updated on

पुणे ः जिल्‍ह्यात वाढते औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे घनकचरा आणि सांडपाण्याच्या वाढत्या समस्येमुळे नद्या आणि उपनद्यांचे प्रदूषण वाढत आहे. याचे भयंकर दुष्परिणाम मानवी आरोग्यासह, शेती, पाणी, जैवविविधता आणि परिस्थितीकीवर होत आहे. भविष्यातील ग्रामीण भागातील पर्यावरणीय गंभीर समस्या रोखण्यासाठी जिल्ह्यात सांडपाणी, घनकचरा आणि नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कंपनी स्थापनेचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

जिल्‍ह्यात वाढत्या प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी ग्रामपंचायत पातळीवर प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित नाहीत. यामुळे ग्रामीण भागात भविष्यात पर्यावरणीय गंभीर परिणाम होणार आहेत. भविष्यातील हे दुष्परिणाम रोखण्यासाठी कंपनी स्थापन करणे गरजेचे आहे. या कंपनीच्या माध्यमातून गावपातळीवर प्रदूषण रोखण्याच्या विविध प्रभावी आणि दूरगामी उपाययोजना करणे शक्य होणार आहे. यासाठी कंपनी स्थापनेचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे.

याबाबतच्या विविध बैठका ज्येष्ठ नेते शरद पवार, पालकमंत्री अजित पवार यांच्या सोबत झाल्या आहेत. त्यानुसार हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कंपनी स्थापनेचा ठराव देखील करण्यात आला असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.

कंपनीअंतर्गत केली जाणारी कामे

  • मुख्य, उपनद्या प्रदूषणमुक्त करत, त्यांचे संवर्धन घाटांचे संवर्धन करणे
  • नागरीभागातून जाणाऱ्या नद्यांच्या किनारी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारणे
  • औद्योगिक पाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करणे किंवा नदीमध्ये सोडणे
  • जल प्रदूषण मुक्तीचे नवीन तंत्रज्ञान शोध, प्रकल्पाचे संनियंत्रण व निधी उभारणे
  • जैवविविधता संवर्धन व वनीकरण करणे - विविध प्रकल्पांचा विकास आराखडा तयार करणे
  • प्रदूषण मुक्तीसाठी शासनाच्या विविध विभागांशी समन्वय राखणे
  • अशी असेल कंपनी

  • अध्यक्ष - आयुष प्रसाद (मुख्य कार्यकारी अधिकारी)
  • उपाध्यक्ष - भारत शेडगे (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी)
  • सचिव - अमर माने (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता)
  • खजिनदार - रवींद्र चव्हाण (मुख्य लेखा व वित्त अधिकारी)
  • सदस्य - संदीप कोहिनकर (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत)
  • सदस्य - सुरेंद्रकुमार कदम (कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग)
  • सदस्य - प्रशांत शर्के (गटविकास अधिकारी हवेली.)
  • ग्रामीण भागातील झपाट्याने वाढणाऱ्या औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे जल, वायू प्रदूषण वाढत आहे. आत्ताच हे धोके ओळखून ते रोखण्यासाठी कार्यवाही करणे गरजेचे आहे. यासाठी पाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनी  स्थापण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे. - आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com