

पुसद, जि. यवतमाळ : केंद्रातील भाजप सरकार शेतकरी व कष्टकऱ्यांच्या विरोधात आहे. देशात शोषण करणारी व्यवस्था निर्माण करीत आहे. त्यामुळे शेतकरी व कष्टकरी अस्वस्थ आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक सभागृहात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत मार्गदर्शन करताना श्री. पाटील बोलत होते. व्यासपीठावर अन्न व औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, प्रदेश महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश युवती अध्यक्ष सक्षणा सलगर, प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, रविकांत वरपे, आमदार इंद्रनील नाईक, जिल्हाध्यक्ष माजी आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया, महिला अध्यक्ष क्रांती राऊत, नगराध्यक्ष अनिता नाईक, डॉ. आशा कदम, निरीक्षक किशोर माथनकर, नाना गाडबैले, वसंतराव पाटील कान्हेकर उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना मानणारा कार्यकर्ता मी पाहिला आहे. या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम संवादातून होत आहे. खरे तर शरद पवार यांच्यासारखा नेता राष्ट्रवादीकडे आहे याचा इतर पक्षांना हेवा वाटतो. त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. चांगल्या कार्यकर्त्यांची फळी उभारली पाहिजे, असेही पाटील या प्रसंगी म्हणाले. संचालन प्रा. संजय चव्हाण यांनी केले. ख्वाजा बेग यांनी आभार मानले.
आमदार इंद्रनील नाईक यांनी यावेळी दुष्काळग्रस्त माळपठाराचे नंदनवन करण्यासाठी पैनगंगेवरील इसापूर धरणातून लिफ्ट इरिगेशन योजना राबवावी, पूस धरणाखाली तीन बॅरिकेट्स उभारावेत, लघु प्रकल्प पूर्ण करावेत, आदी मागण्या केल्या असता ‘नाईकांच्या कामांना ‘ना’ नाहीच’ या शब्दात त्यांनी या मागण्या पूर्ण झाल्या म्हणून समजा, असे खात्रीपूर्वक सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.