

मुंबई : पैठण आणि औरंगाबाद तालुक्यांतील १७८ गावांतील ग्रीड पाणी पुरवठा योजनेला ‘जल जीवन मिशन’अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. ३०७ कोटी ६५ लाख रुपये किमतीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
या कामास मंत्रालयातील बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या बैठकीस पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार अंबादास दानवे, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास भुमरे आदींसह अधिकारी उपस्थित होते.
पैठण तालुक्यातील १७८ गावांतील लोकसंख्येचा विचार करून दरदिवशी ५५ लिटर दरडोई असा निकष लावला आहे. यासाठी ६ हजार २७२ इतका दरडोई खर्च व सूट असे धरून दरडोई खर्च १ हजार ६६५ रुपये असलेल्या गावांना ही नळपाणी योजना प्रस्तावित होती. या योजनेसाठी ३०७ कोटी ६५ लाख खर्च येणार आहे. या अंदाजपत्रकास व आराखड्यास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत शर्तीची पूर्तता करण्याच्या अटीवर मान्यता दिली. ही योजना तातडीने पूर्णच करण्याची सूचना पाटील यांनी दिली.
वॉटर ग्रीड पाणीपुरवठा योजनेच्या कामास लवकरच सुरुवात होईल. पैठण आणि औरंगाबाद तालुक्यातील १७८ गावांतील लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, अशी आशा आहे. ही योजना तत्काळ कार्यान्वित करण्यासाठी सूचना दिल्याने लवकर पाणी मिळेल. - संदीपान भुमरे, रोजगार हमी योजना मंत्री
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.