

अमरावती ः तूर आणि हरभरा अनुदान योजनेचा जिल्ह्यातील ४५ हजार १२४ पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. ६२ कोटी ६१ लाख रुपयांचे अनुदान या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हमीभावाने तूर आणि हरभरा खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आल होती. परंतु ऑनलाईन नोंदणी करण्यात आल्यानंतरही काही शेतकऱ्यांची तूर आणि हरभरा खरेदी करणे सरकारला शक्य झाले नाही. अशा शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात तांत्रिक अडचणींमुळे अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. अशा शेतकऱ्यांना तालुका खरेदी केंद्रावरून अनुदान वितरीत करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
याकरिता शेतकऱ्यांनी त्यांचे आधारलिंक बॅंक खाते आणि आधारकार्डची सत्यप्रत खरेदी केंद्रावर जमा करावयाची आहे. अमरावती जिल्ह्यात ४८ हजार ७३६ पात्र लाभार्थी आहेत. यापैकी तुरीच्या अनुदानाचे ३० हजार ५२९ लाभार्थ्यांपैकी २२८ हजार ४५६ शेतकऱ्यांना ३९ कोटी २७ लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले. तांत्रिक अडचणीमुळे २ हजार ०७३ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात २ कोटी ८६ लाख रुपयांचे अनुदान जमा झालेले नाही, तसेच हरभऱ्याच्या अनुदानाचे जिल्ह्यात १८ हजार २०८ पात्र लाभार्थी शेतकरी आहेत. त्यापैकी १६ हजार ६६८ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात २३ कोटी ३४ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
तांत्रिक अडचणींमुळ १ हजार ५४० शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात तुरीची २ कोटी १३ लाख रुपयांची रक्कम जमा होऊ शकली नाही, असे जिल्हा मार्केटिंगच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.