जतमधील ४२ गावांच्या पाण्यासाठी करार नाहीच

कर्नाटकातून जत तालुक्यातील ४२ गावांना पाणी देण्याबाबत नुकतीच केवळ चर्चा झाली आहे. या बाबत अद्याप करार झाला नाही. यासाठी तांत्रिक समिती स्थापन केली जाणार आहे.
जतमधील ४२ गावांच्या पाण्यासाठी करार नाहीच Of 42 villages in Jat No contract for water
जतमधील ४२ गावांच्या पाण्यासाठी करार नाहीच Of 42 villages in Jat No contract for water
Published on: 
Updated on: 

सांगली : कर्नाटकातून जत तालुक्यातील ४२ गावांना पाणी देण्याबाबत नुकतीच केवळ चर्चा झाली आहे. या बाबत अद्याप करार झाला नाही. यासाठी तांत्रिक समिती स्थापन केली जाणार आहे. समिती स्थापन करण्यापासून ते अहवाल करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. समितीचा अभ्यास अहवाल पाणी देण्यास सोयीचा असेल तरच निर्णय होईल., अशी माहिती जलसंपदा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव सांगण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे कर्नाटकातून जतच्या ४२ गावांना पाणी मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. जत तालुक्यातील ४२ गावे पाण्यासाठी झगडत आहेत. या गावांना पाणी देण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील अधिकाऱ्यांबरोबर अनेक बैठका झाल्या आहेत. या बैठकीत आजपर्यंत पाणी देतो, अशी भूमिका दर वर्षी कर्नाटक राज्य सरकार मांडत आले आहे. मात्र, अद्यापही कर्नाटक राज्य सरकारने ठाम भूमिका घेतली नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील कर्नाटकातून पाणी देण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी १० कोटींची घोषणीही केली होती. मात्र, आवश्यक अशी कृती झाली नाही. त्यामुळे जतकरांना कर्नाटकातून येणारे पाणी आजवर केवळ मृगजळच ठरले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्यात चार टीएमसी पाणी देण्याबाबत चर्चा झाली. या चर्चेत जत तालुक्यातील ४२ गावांना पाणी देण्याबाबत सर्वस्तरावर चर्चा झाली. मात्र, आता कर्नाटकातून जत तालुक्यातील गावांना पाणी देण्याबाबतच करार झालेला नाही. यामध्ये तांत्रिक समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. ही समिती स्थापन झाल्यानंतर या समितीकडून त्याचा तांत्रिक अभ्यास केला जाईल. त्यामध्ये पाणी कसे उपलब्ध करायचे, ते कोठून द्यायचे, आर्थिकदृष्ट्या पाणी देणे सोयीचे ठरणार आहे का? यासह अनेक गोष्टींचा अभ्यास केला जाईल. त्याचा अहवाल सरकारला सादर केला जाईल.

तो अहवाल दोन्ही राज्यातील पाटबंधारे विभागाकडे सोपविला जाईल. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर त्याचा निर्णय होईल. या अहवालातून पाणी देण्यासाठी सोयीचे वाटले तरच निर्णय होईल. यासाठी तीन महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे, असेही संबंधित अधिकारी म्हणाले. पाणी हवे उन्हाळ्यात राज्यातून कर्नाटकाला उन्हाळ्यात चार टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. आता पावसाळ्यात कर्नाटकातून राज्याला चार टीएमसी पाणी देईल, असे ठरले आहे. अर्थात हे पाणी जत तालुक्याच्या ४२ गावांना पावसाळ्यातच पाणी मिळणार आहे का? असा सवाल निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात जत तालुक्यात भीषण पाणीटंचाई असते, त्यामुळे पाणी उन्हाळ्यातच हवे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.