

पुणे ः गेल्या पंधरा दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस बरसत आहे. यामुळे धरणांतील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत असल्याने जिल्ह्यातील १२ धरणे जवळपास भरली आहे. या धरणांत ८० टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.
दहा धरणांतून पाण्याचा विसर्ग नदीला सोडण्यात आला आहे. रविवारी (ता. १६) सकाळी आठ वाजेपर्यंत नव्याने १२.७१ टीएमसी तर एकूण १३६.६८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यात उजनी धरणातील पाणीसाठ्याचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
गुरुवारी (ता. १३) जिल्ह्यातील खडकवासला, कळमोडी, वीर या तीन धरणांतून विसर्ग मुळा व भीमा, निरा नदीत सोडण्यात आला होता. त्यामुळे नद्या काही प्रमाणात दुथडी भरून वाहण्यास सुरुवात झाली होती. आता दहा धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी (ता. १६) सकाळपर्यंत पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक १०६ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.
आत्तापर्यंत कळमोडी, खडकवासला, वीर, आंध्रा, नाझरे, वीर, गुंजवणी, कासारसाई, पानशेत, मुळशी ही तीन धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर वडज, वडीवळे,भाटघर या धरणांत जवळपास ८० टक्केपेक्षा अधिक भरली आहेत. धरण पाणलोटक्षेत्रनिहाय झालेला पाऊस ः पानशेत १०६, मुळशी, टेमघर, नीरा देवघर, वरसगाव १०२, वडीवळे १००, गुंजवणी ६६, भाटघर ६५, पवना ६५, खडकवासला ४४, डिंभे ३२, आंध्रा ३०, कळमोडी २८, कासारसाई २५, भामाआसखेड २४, वीर २२, माणिकडोह, येडगाव १६, वडज १२, नाझरे ११, चासकमान १०, चिल्हेवाडी ९, उजनी ९, पिंपळगाव जोगे ८, विसापूर ५.
| धरण | विसर्ग |
| वीर | ३७,०६६ |
| खडकवासला | ९ ६१८ |
| वडीवळे | २०९५ |
| गुंजवणी | ३५२ |
| चिल्हेवाडी | २१४६ |
| नाझरे | ३८२ |
| कळमोडी | ८१२ |
| आंध्रा | ३३५ |
| कासारसाई | १५० |
| मुळशी | १००० |
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.