अळिंबी प्रथिनांच्या निर्मितीतून पोषकतेमध्ये होऊ शकेल वाढ

अळिंबा हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे.
अळिंबा हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे.
Published on: 
Updated on: 

आहारातील पोषकता वाढवण्यासाठी वनस्पतिजन्य (विशेषतः अळिंबीपासून) प्रथिनांच्या निर्मितीसाठी विविध कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले असून, त्यातील ‘प्युअर टेस्ट’ या कंपनीमध्ये बाऊल्डर येथील मायकोटेक्नॉलॉजी ही कंपनी ३५ दशलक्ष डॉलर इतका आर्थिक निधी गुंतवणार आहे. यातून प्रतिवर्ष ४ हजार टन उच्चदर्जाचे प्रथिन उत्पादन घेण्याचे नियोजन केले जात आहे. सध्या क्विण्वन प्रक्रियेद्वारे विविध प्रकारची प्रथिने मिळविण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी त्याला किंचित मातकट अशी चव लागते. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीची भावना आहे. यावर मात करण्यासाठी नैसर्गिकरीत्या मिळवलेल्या अळिंबीपासून स्प्रे ड्रायिंग तंत्राने निर्जलीकरण केलेली भुकटी तयार करण्यात येते. त्यामुळे प्रथिनांचे प्रमाण कोरड्या स्थितीमध्ये ७७ ते ८० टक्के असते. ही अळिंबी वाटाणा किंवा भातातील प्रथिनांवर वाढवलेली असते. मायकोटेक्नॉलॉजीच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, प्युअर टेस्ट हा अमेरिकेतील क्विण्वन केलेल्या भाजीपाला प्रथिनांचा ब्रॅण्ड आहे. त्यामध्ये वनस्पतीआधारित प्रथिने तयार केली जातात. योग्य प्रमाणामध्ये प्रथिनांचे प्रमाण झाल्यानंतर (सुमारे ४८ तासांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते.) अळिंबीचा काढणी केली जाते. त्यानंतर ती वाळवून अत्यंत बारीक अशी भुकटी केली जाते. त्यात कॅलरी, मेद, कर्बोदके यांचे प्रमाण कमी असून, त्यात अन्य कोणत्याही घटकांपेक्षा जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते.

  • विविध प्रकारच्या टॉर्टिलामध्ये (मेक्सिकन मक्याच्या चपातीला टॉर्टिला म्हणतात.) मिसळण्यासाठी त्यांचा वापर होऊ शकतो. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, तसेच क्रॅकिंग होणे कमी होते.
  • मांसाचे पदार्थ, सॅलड, ड्रेसिंग, तृणधान्ये, प्रथिन बार आणि तयार पेये यांमध्ये त्यांचा वापर करता येतो.
  • मोठा प्रकल्प उभारला जाणार... प्युअर टेस्टच्या व्यावसायिक उत्पादनासाठी ४००० मे. टन प्रतिवर्ष इतके उत्पादन करण्यायोग्य कारखाना औरोरा (कोलोरॅडो) येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक तो आर्थिक निधी मायकोटेक्नॉलॉजीद्वारे पुरवला जाणार आहे. हा प्रकल्प नोव्हेंबर २०१८ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com