रब्बीसाठी अनुदानित हरभरा, गहू, ज्वारी व मका बियाणे उपलब्ध 

नाशिक : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगामासाठी हरभरा, रब्बी ज्वारी, गहू व रब्बी मका बियाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली आहे
Subsidized gram, wheat, sorghum and maize seeds available for rabbi
Subsidized gram, wheat, sorghum and maize seeds available for rabbi
Published on
Updated on

नाशिक : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगामासाठी हरभरा, रब्बी ज्वारी, गहू व रब्बी मका बियाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली आहे . 

उपलब्ध अनुदानित बियाण्याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेले शेतकरी तसेच लक्ष्यांकपूर्तीसाठी ऑफलाइन पद्धतीने शेतकरी निवडून तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात हरभरा ८०१६ क्विंटल, गहू ३२९० क्विंटल, ज्वारी ७० क्विंटल व मका ४३३ क्विंटल इतक्या अनुदानित बियाण्यांचे तालुकानिहाय वितरणासाठी नियोजन करण्यात आले आहे. 

१० वर्षे आतील प्रमाणित हरभरा बियाणे (फुले विक्रम, RVG -202 साठी) प्रति किलो रुपये २५ अनुदान, रब्बी मका पिकासाठी रुपये ९५ प्रति किलो किंवा किमतीच्या ५० टक्के अनुदान, रब्बी ज्वारी रुपये ३० प्रति किलो अनुदान तसेच ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत हरभरा (फुले विक्रम, RVG-202, जॅकी-9218 साठी) प्रति किलो रुपये २५ अनुदान, गहू (फुले समाधान, लोकवन व एच.डी.२१८९) पिकासाठी प्रति किलो रुपये १६ अनुदान या प्रमाणे शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यंत्रणेकडील वितरकांमार्फत तालुकास्तरावर परमिटद्वारे वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांना १ एकर क्षेत्रासाठी अनुदानित बियाण्याचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व सातबारा उताऱ्याच्या झेरॉक्स प्रतीसह तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधून परमीट मिळवून अनुदानित बियाण्यांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन सोनवणे यांनी केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com