Portfolio Distribution : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर, कोणत्या खात्यावर कोणाची वर्णी! पहा एका क्लिकवर..

DCM Ajit Pawar : राष्ट्रवादीमध्य बंड करून अजित पवार यांच्यासह ९ मंत्र्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. पण अनेक दिवसांपासून खातेवाटप रखडले होते. ते आज अखेर राज्याच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
Portfolio Distribution
Portfolio Distributionagrowon
Published on
Updated on

Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्याचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुमारे १३ दिवसांनी खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ पदभार ठेवण्यात आलेला आहे. कृषी खाते धनंजय मुंडे यांना तर अन्न व नागरी पुरवठा खाते छगन भुजबळ यांना देण्यात आले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर खाते वाटप जाहीर करण्यात आल्याची चर्चा आहे.

Portfolio Distribution
Maharashtra Politics : अखेर ठरलं... अर्थ खातं अजित पवारांनाच, धनंजय मुंडेंकडे कृषी, तर सहकारचा भार वळसे पाटलांकडे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, पणन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह विनियोजन विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील

उपमुखमंत्री अजित पवार - अर्थ आणि नियोजन

राष्ट्रवादीचे मंत्री

छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा

धनंजय मुंडे - कृषी

दिलीप वळसे -पाटील - सहकार

धर्मराव आत्रम - अन्न व औषध प्रशासन

आदिती तटकरे - महिला व बाल कल्याण

अनिल पाटील - मदत व पुनवर्सन, आपत्ती व्यवस्थापन

हसन मुश्रीफ - वैद्यकिय शिक्षण, विशेष सहाय्य

संजय बनसोडे - क्रिडा व युवक कल्याण, बंदरे

भाजपाचे मंत्री

मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास आणि उद्योजकता,

राधाकृष्ण विखे पाटील – महसूल, पशुसंवर्धन , दुग्धविकास

अतुल सावे – गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण

गिरीश महाजन – ग्रामविकास आणि पंचायती राज, पर्यटन

विजयकुमार गावित – आदिवासी विकास

रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न आणि नागरी पुरवठा

चंद्रकांत पाटील – उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

सुरेश खाडे – कामगार

सुधीर मुनगंटीवार – वन, सास्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय

शिंदे गटाचे मंत्री

उदय सामंत – उद्योग

दीपक केसरकर – शालेय शिक्षण आणि मराठी भाषा

शंभूराजे देसाई – राज्य उत्पादन शुल्क

दादा भुसे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा आणि स्वच्छता

संदीपान भुमरे – रोहयो योजना, फळोत्पादन

अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन

तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

संजय राठोड – मृदा व जलसंधारण विभाग

राज्यपाल रमेश बैस यांनी मंत्रीमंडळाच्या खातेवाटपाला मंजुरी दिली आहे. लवकरच सर्व मंत्री आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com