पुणे जिल्ह्यात ७५० कोटींचा महसूल जमा

विभागात पुणे जिल्हा महसूल वसुलीस ठरला अव्वल
Pune revenue collection
Pune revenue collectionAgrowon
Published on
Updated on

पुणे : जिल्हा महसूल विभागाकडून आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक (record break) अर्थात सुमारे ७५० कोटी रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे. यामुळे विभागात पुणे जिल्हा महसूल (Pune District Revenue) वसुलीस अव्वल ठरला आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट राहिले. तरीही प्रारंभीपासून महसूल (Revenue) वसुलीवर दिलेले लक्ष, आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या घटकांवर लक्ष देऊन केलेली जाणीवपूर्वक वसुली, महसूल वसुलीसाठी शोधलेले नवे पर्याय शोधण्यात आल्याने रेकॉर्ड ब्रेक झाला आहे.

Pune revenue collection
तूर आयातीला वर्षभराची मुदतवाढ

प्रतिवर्षी सर्व विभागांना राज्य सरकारने (State Government) ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार गेल्या तीन वर्षांच्या तुलनेमध्ये महसूल वसुलीमध्ये प्रशासनाने आघाडी घेतली. गेल्या २०१९ - २० साली ५७२ कोटी, २०२० - २१ मध्ये ५७७ कोटी, २०२१ - २२ मध्ये तब्बल ७५० कोटी रुपयांचा महसूल टप्पा जिल्हा प्रशासनाने पार केला. या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनाला ते अवघड झाले होते. पण योग्य नियोजनाने प्रशासनाने आपले उद्दिष्ट पार केले.

निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे म्हणाले, ‘‘यंदा ३०८ कोटी रुपयांचा जमीन महसूल, २१० कोटी रुपयांचा गौणखनिज कर, २३१ कोटी रुपयांचा शिक्षण कर व रोजगार हमी (Employment Guarantee) कर वसूल करण्यात आला आहे. असा तब्बल ७५० कोटी रुपयांचा महसूल प्रशासनाने गोळा केला आहे. प्रत्येक तालुक्यातील थकीत जमीन महसूल (Land revenue) गौणखनिज महालेखाकार अंतर्गत लेखा परीक्षण व अन्य तत्सम महसुली नजराणा प्रकरणांमध्ये दहा लाखांपेक्षा जास्त असलेल्या मोठ्या वसुली प्रकरणांची यादी करून त्यामध्ये पाठपुरावा करण्यात आला.’’

मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे तीव्र संकट होते. त्यामुळे महसूल गोळा करताना काही अडचणींचा सामना करावा लागला. पण यंदा पहिल्यापासून योग्य नियोजन केल्याने ७५० कोटींचा टप्पा पार करता आला. वेळोवेळी बैठका घेऊन वसुलीबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार हा महसूल वसूल झाला आहे.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com