Orchard Plantation : फळबागेसाठी आवश्‍यक खतांना मिळणार १०० टक्के अनुदान ; कृषीमंत्री धनंजय मुंडे

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana : माजी कृषीमंत्री दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केली आहे.
Horticulture
Horticulture Agrowon
Published on
Updated on

Subsidy Fertilisers : राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने सुरू असलेल्या ‘स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने’अंतर्गत आवश्यक खतांना १०० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी (ता. २१) दिली.

Horticulture
MGNREGA Scheme : ‘मनरेगा’तून २७८० शेतकऱ्यांनी केली फळबाग लागवड

फलोत्पादन विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत १५ फळपिकांचा समावेश असून याअंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यासारख्या कामांना १०० टक्के अनुदान देण्यात येते. फुंडकर यांच्या जयंतीदिनी या योजनेची माहिती देण्यात आली.

फळबाग लागवडीअंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते, त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. याबाबत यंदाच्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुंडे यांनी समाजमाध्यमातून दिली आहे. या बाबतचा शासन आदेश लवकरच काढण्यात येणार आहे. ही योजना फलोत्पादन विभागाची असली तरी ती कृषी विभाग राबवीत असतो.

Horticulture
Horticulture Scheme : फळबाग लागवड योजना ; अनुदानासह शेकऱ्यांना देणार मोफत रोपे

राज्यात ६ जुलै, २०१८ रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून याअंतर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. याअंतर्गत खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन १०० टक्के अनुदान देते. यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्याने आवश्‍यक खतांसाठी अनुदान दिले जाणार आहे.

१०२ कोटींच्या निधीच्या कार्यक्रमास मान्यता

महात्मा  गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी पात्र ठरत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. यंदा राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यासाठी १०२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये सर्वसाधारण गटासाठी १०० कोटी, अनुसूचित जातीसाठी २ कोटी, अनुसूचित जमातींसाठी ५० लाख रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. या निधीच्या कार्यक्रमास मंजुरी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com