Soybean Market Rate : अमेरिकेत सोयाबीनचे भाव पुन्हा का पडले ? सोयाबीनच्या भावावर नेमका कशाचा दबाव येत आहे ?

US Department of Agriculture : अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने आपला ऑक्टोबर महिन्याचा अंदाज नुकताच प्रसिध्द केला. या अहवालाने सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढवली आहे. कारण यामुळे सोयाबीनचे भाव पुन्हा पडले.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

Pune News : अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने आपला ऑक्टोबर महिन्याचा अंदाज नुकताच प्रसिध्द केला. या अहवालाने सोयाबीन उत्पादकांची चिंता वाढवली आहे. कारण यामुळे सोयाबीनचे भाव पुन्हा पडले.जागतिक सोयाबीन उत्पादन विक्रमी पातळी गाठणार हे या अहवालाने म्हटले आहे. विशेष म्हणजेच सोयाबीन उत्पादनात आघाडीवर असलेल्या अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटीना या देशांमध्ये विक्रमी उत्पादन होणार आहे. त्यामुळे जागतिक सोयाबीन बाजारावरील दबाव पुन्हा वाढला. अहवालानंतर भाव पुन्हा कमी झाले. 

यंदा अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटीना या देशांमध्ये विक्रमी उत्पादन होईल, असा अंदाज युएसडीएनं दिला. अमेरिकेचं उत्पादन यंदा १ हजार २४७ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज आपल्या ऑक्टोबरच्या अहवालात युसएडीएने दिला. तर ब्राझीलमध्ये १६९० लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे. म्हणजेच ब्राझीलही यंदा उत्पादनाचा विक्रम करणार आहे. तसेच अर्जेंटीना ५१० लाख टन उत्पादनाचा टप्पा गाठेल, असेही युएसडीएने आपल्या अहवालात म्हटले आहे.

Soybean
Soybean Market : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी १ हजार ६६१ शेतकऱ्यांची नोंदणी

दुसरीकडे अमेरिकेतील सोयाबीनची काढणी सध्या सुरु आहे. त्यामुळे उत्पादकतेचे आकडे पुढे येत आहेत. युएसडीएने अमेरिकेच्या सोयाबीन उत्पादनाच्या अंदाजात सप्टेंबरच्या तुलनेत  एक लाख टनाने कपात केली. म्हणजेच ऑक्टोबरच्या अंदाजात गेल्या महिन्याच्या तुलनेत कपात केली. पण तरीही उत्पादनाचा अंदाज विक्रमी पातळीवर कायम आहे. म्हणजेच विक्रमी उत्पादन होणार यावर युएसडीए ठाम आहे.

अमेरिकेत यंदा सोयाबीन काढणी क्षेत्र विक्रमी पातळीवर पोचणार आहे, असेही युएसडीएने स्पष्ट केले. त्यामुळे अमेरिकेतील सोयाबीनचा भाव आज पुन्हा नरमला. सोयाबीनचे वायदे अमेरिकेच्या वायदे बाजारात ९.९८ डाॅलर प्रतिबुशेल्सपर्यंत कमी झाले. हा भाव गेल्या एक महिन्यातील निचांकी होता. अमेरिकेतील बाजारभावाचा परिणाम जागतिक पातळीवर दिसून येत आहे. 

Soybean
Soybean Bajarbhav : सोयाबीनचा भाव कसा राहील? शेतकऱ्यांसाठी फायदेशीर विक्री कशी राहील?

चीन जगातील सोयाबीनचा सर्वात मोठा ग्राहक आहे. मात्र चीनची सोयाबीन आयात यंदा गेल्या वर्षीपेक्षा कमी राहील, असा अंदाज युएसडीएने दिला. पण सोयाबीन बाजारावर सर्वाधिक दबाव आहे तो उत्पादनवाढीचा. त्यामुळेच सप्टेंबर महिन्यात चीनसारख्या महत्वाच्या ग्राहक देशाने विक्रमी सोयाबीन आयात करूनही बाजारावर पुन्हा दबाव आला. 

तर मागील काही महिन्यांमध्ये जागतिक पातळीवर सोयाबीनचे गाळप वाढले. पण हे गाळप प्रामुख्याने सोयातेलासाठी झाले. कारण इंडोनेशिया आणि मलेशियातून पामतेलाची निर्यात कमी झाल्याने भाव वाढले. त्यातही इंडोनेशियातील उत्पादन घटले आहे. सध्या पामतेल हे सोयातेल आणि सूर्यफुल तेलापेक्षा महाग आहे. पामतेलाचे भाव वाढल्याने सोयातेलाला चांगली मागणी आहे. त्यामुळे सोयाबीनचे गाळप वाढले. मात्र दुसरीकडे सोयापेंडचे साठे निर्माण झाले. परिणामी सोयापेंडच्या भावावर दबाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड स्वस्त झाल्याचा परिणाम भारताच्या सोयापेंडवरही होत आहे. 

भारतातही यंदा सोयाबीनची लागवड वाढली. मात्र सोयाबीन पिकाचे नुकसान वाढले आहे. त्यामुळे उत्पादन नेमके किती होते? याविषयी  वेगवेगळ्या चर्चा बाजारात आहेत. पण एकूणच सर्व परिस्थितीचा बाजारावर दबाव आला आहे. सोयाबीनचा भाव बाजारात अगदी ३५०० रुपयांपासून सुरु होत आहे. हा भाव हमीभावापेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीन विकावे. किमान हमीभाव तरी पदरात पडेल. खुल्या बाजारात सोयाबीनचा भाव खूपच कमी आहे. सरकारने १३ लाख टन सोयाबीन खरेदीला परवानगी दिली आहे. खरेदीसाठी नोंदणीही सुरु आहे. शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात सोयाबीन विकल्यापेक्षा सरकारला हमीभावाने विक्री करावी. हमीभावाचा पर्याय असल्याने कमी दरात विक्री करू नये. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com