Soybean Bajarbhav : सोयाबीनचा भाव कसा राहील? शेतकऱ्यांसाठी फायदेशीर विक्री कशी राहील?

Soybean Rate : सोयाबीनचा बाजार यंदा दबावात आहे. सोयाबीनला हंगामाच्या सुरुवातीला हमीभावही मिळताना दिसत नाही. सोयाबीनचे भाव दबावात असण्याला काही कारणे आहेत.
Soybean Market
Soybean Market Agrowon
Published on
Updated on

Pune News : सोयाबीनचा बाजार यंदा दबावात आहे. सोयाबीनला हंगामाच्या सुरुवातीला हमीभावही मिळताना दिसत नाही. सोयाबीनचे भाव दबावात असण्याला काही कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारातील मंदी आणि देशातून सोयापेंडची कमी झालेली निर्यात, ही कारणे आहेत.

सध्या नवे सोयाबीनला सरासरी ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावानेच सोयाबीन विक्री फायदेशीर ठरू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

जागतिक पातळीवर यंदा सोयाबीनचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. अमेरिका, ब्राझील, अर्जेंटीना, पराग्वे, चीन आणि भारत या सर्व देशांमध्ये यंदा सोयाबीन उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोयाबीनचा पुरवठा वाढणार आहे.

परिणामी जागतिक बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव दबावात आहेत. सोयाबीनचा बाजारभाव अमेरिकेच्या वायदेबाजारात मंदीत आहे. सोयाबीन सतात १० डाॅलर ते १०.५० डाॅलरच्या प्रतिबुशेल्सच्या दरम्यान आहेत. तर सोयापेंड ३२० ते ३४० डाॅलर प्रतिटनांवर होते. शुक्रवारी या भावात पुन्हा काहिशी नरमाई दिसून आली.

Soybean Market
Soybean Market : सोयाबीनसाठी लातुरात जिल्ह्यात चौदा खरेदी केंद्रे मंजूर

अमेरिकेतील सोयाबीन आता बाजारात येत आहे. तर ब्राझीलमध्ये पेरणी सुरु झाली. अर्जेंटीनातही पेरणी सुरु होणार आहे. त्यातच यंदा ला निना परिस्थिती असणार आहे. पण ला निना नेमका कधी येणार? हा प्रश्न मागील ४ महिन्यांपासून कायम आहे. आता नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात ला निना तयार होईल, अशी भाकिते येत आहेत.

ला निना असताना ब्राझील आणि अर्जेंटीनात कमी पाऊस, पावसातील खंड, दुष्काळी परिस्थिती अशा परिस्थिती निर्माण होतात. पण ला निना नेमका कधी येणार? त्याची तीव्रता कधी वाढणार? त्याचा परिणाम ब्राझील आणि अर्जेंटीनातील पिकावर होणार का? हे पुढच्या काळात कळेल.

Soybean Market
Soybean Market : सोयाबीनला संजीवनी मिळणार का?

सोयापेंडच्या मागणीवर परिणाम

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे भाव दबावात आहेत. त्यामुळे भारताच्याही सोयापेंडचे भाव दबावात आले. भारतीय सोयापेंडची निर्यातही मागच्या महिन्यापासून कमी होत आहे. तसेच देशातही सोयापेंडचा उठाव कमी झाला. भाव कमी असूनही उठाव कमी होण्याला काही कारणे आहेत.

त्यात प्रामुख्याने स्वस्त डीडीजीएसचा पर्याय. मागील काही महिन्यांमध्ये इथेनाॅलसाठी मक्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. मक्यातून इथेनाॅल काढल्यानंतर जो अवशेष, चुरा शिल्लक राहतो त्याला डीडीजीएस म्हणतात. हे डीडीजीएस स्वस्त आहे. त्याचा वापर पोल्ट्री आणि पशुखाद्य उद्योगात केला जात आहे. याचा दबाव सोयापेंडच्या मागणीवर होत आहे.

बाजाराचा दिशा आणि हमीभावाचा पर्याय

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती आणि देशातील परिस्थिती पाहता यंदा सोयाबीनचा भाव शेतकऱ्यांना अपेक्षित पातळीवर पोचण्याची शक्यता कमीच आहे. सध्या सोयाबीनचा भाव सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे.

पुढील चार महिने बाजारात सोयाबीनची आवक जास्त असेल. त्याचा दरावर दबाव राहील. त्यामुळे खुल्या बाजारातील भाव हमीभावाचा टप्पा पार करण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री हमीभावाने करावी. त्यापेक्षा कमी भावात सोयाबीनची विक्री करू नये, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com