Soybean Rate
Soybean RateAgrowon

Soybean Rate : सोयाबीनचे दर का नरमले?

केंद्र सरकारने सोयाबीनवरील स्टाॅक लिमिट काढल्यानंतर प्रक्रिया प्लांट्स, स्टाॅकिस्ट आणि निर्यातदारांनी सोयाबीन खरेदी वाढवली. याचा फायदा देशातील सोयाबीन दर सुधारण्यासाठी झाला.

पुणेः देशातील बाजारात सोयाबीनचे दर (Soybean Rate) वाढल्यानंतर विक्रीही काहीशी वाढलेली दिसली. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीनचे दर (Soybean Market) नरमले होते. तसेच पामतेल आणि सोयातेलाच्या दरातही (Soyaoil Rate) नरमाई पाहायला मिळाली. त्याचा परिणाम देशातील सोयाबीन बाजारावरही झाला. आज देशातील सोयाबीनचे दर जवळपास २०० रुपयाने नरमले होते.

Soybean Rate
Cotton Soybean : अरबी समुद्रात गुरुवारी शेतकऱ्यांसह जलसमाधी घेऊ

केंद्र सरकारने सोयाबीनवरील स्टाॅक लिमिट काढल्यानंतर प्रक्रिया प्लांट्स, स्टाॅकिस्ट आणि निर्यातदारांनी सोयाबीन खरेदी वाढवली. याचा फायदा देशातील सोयाबीन दर सुधारण्यासाठी झाला. सोयाबीनचे दर सुधारल्यानंतर बाजारात आवकही वाढली होती. खेडा खरेदीही जोमात झाली. मात्र आता दर नरमले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर कमी झाल्यानंतर सोयाबीन दरही नरमले आहेत. मलेशिया बुर्सा मलेशिया एक्सचेंजवर पामतेलाचे दर मागील आठवड्यातील ४ हजार २९३ रिंगीट प्रतिटनांवरून ३ हजार ९८८ रिंगीटवर आले. म्हणजेच दर ३०५ रिंगीटने नरमले. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेलाचेही दर कमी झाले. सीबाॅटवर सोयातेलाचे दर ७७ सेंट प्रतिपाऊंडवरून ७३ सेंटपर्यंत नरमले. सोयाबीनचे दरही १४.५५ डाॅलर प्रतिबुशेल्सवरून १४.१९ डाॅलरवर आले. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर कमी झाल्याचा परिणाम देशातील बाजारावर जाणवला.

Soybean Rate
Soybean Rate : यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनसाठी आठ हमीभाव केंद्रे

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडेचे दर कमी झाले. मात्र देशातील सोयाबीनचे दर तुलनेत जास्त होते. त्यामुळं सोयापेंड निर्यातीचे करार कमी झाले. त्याच वेळी खाद्यतेलाचेही दर नरमल्याचा परिणाम देशातील बाजारावर झाला. आज मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीनचे दर १५० ते २०० रुपयाने कमी केले. त्यामुळे देशातील महत्वाच्या बाजार समित्यांमधील दर जवळपास २०० रुपयाने नरमले होते. या दरपातळीवर शेतकरी सोयाबीनची विक्री कशी करतात यावरच सोयाबीनचा दर काही प्रमाणात टिकून आहे, असं जाणकारांनी सांगितलं.

आजची दरपातळी

सध्या देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. मध्य प्रदेशातील सरासरी दर ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर महाराष्ट्रात सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयाने सोयाबीन विक्री होत आहे. सोयाबीन बाजारातील स्थिती पाहता यंदा सोयाबीन किमान ५ हजार तर कमाल ६ हजारांपर्यंत दर मिळू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com