Wheat Procurement Target : गव्हाची पेरणी वाढूनही खरेदीची उद्दीष्ट कमीच; गहू खरेदीचे उद्दीष्ट ३०० लाख टनांवर

Agricultural Target Update : सरकारने यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होईल, असा अंदाज दिला. गेल्या तीन वर्षात सरकारला खरेदीचे उद्दीष्ट साध्य करता आले नाही. त्यामुळे यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज असूनही गहू खरेदीचे उद्दीष्ट कमीच ठेवण्यात आले.
Wheat
WheatAgrowon
Published on
Updated on

Pune News : सरकारने यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होईल, असा अंदाज दिला. गेल्या तीन वर्षात सरकारला खरेदीचे उद्दीष्ट साध्य करता आले नाही. त्यामुळे यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज असूनही गहू खरेदीचे उद्दीष्ट कमीच ठेवण्यात आले. यंदा हमीभावाने ३०० लाख टन खरेदीचे उद्दीष्ट आहे. तसेच गव्हाची पेरणी अंतिम टप्प्यात आली असून बदलत्या वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशात यंदा १ हजार १५० लाख टन गहू उत्पादन होईल, असा अंदाज केंद्र सरकारने दिला आहे. म्हणजेच यंदा देशात विक्रमी गहू उत्पादन होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. विक्रमी उत्पादन झाल्यानंतर सरकारची खरेदीही जास्त होणे अपेक्षित आहे. पण सराकरने गहू खरेदीचे उद्दीष्ट कमीच ठेवले आहे. यामुळे गहू बाजारातील सर्वच घटकांच्या भुवया उंचावल्या आहेत. देशातील पेरणीही गेल्यावर्षीपेक्षा आणि सरासरीपेक्षा पुढे गेली आहे, अशी माहिती सरकारने पेरणी अहवालात दिली. मग असे असताना सरकारने गहू खरेदीचे उद्दीष्ट कमी का ठेवले? याची चर्चा आता बाजारात सुरु आहे.

Wheat
Wheat Crop Management : गहू पिकात सिंचन, आंतरमशागत महत्त्वाची

सरकारने यंदा गव्हासाठी २ हजार ४२५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. भारतीय अन्न महामंडळ रेशनवर आणि खुल्या बाजारात विक्रीसाठी गव्हाची खरेदी करते. मात्र खरेदीचे उद्दीष्टच कमी ठेवण्यात आले. २०२४-२५ च्या हंगामात म्हणजेच गेल्या हंगामात सरकारने ३२० लाख टन खरेदीचे उद्दीष्ट ठेवले होते. पण प्रत्यक्षात सरकारला २६६ लाख टनांचीच खरेदी करता आली. तर २०२३-२४ च्या हंगामात सरकारने ३४१ लाख टन खरेदीचे उद्दीष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात मात्र २६२ लाख टनांचीच खरेदी करता आली. तर २०२२-२३ मध्ये ४४४ लाख टन उद्दीष्ट असताना केवळ १८८ लाख टन गहूच भारतीय अन्न महामंडळाला खरेदी करता आला.

Wheat
Wheat Sowing : खपली गहू पेरणी खानदेशात अल्प

चढ्या भावाचा खरेदीला फटका

देशातील बाजारात कोरोनानंतर दरात सुधारणा व्हायला सुरुवात झाली. तर रशिया आणि युक्रेन युध्दामुळे दरावाढीला फोडणी मिळाली. बाजारात सतत हमीभावापेक्षा जास्त दर असल्याने सरकारच्या खेरदीला कमी प्रतिसाद मिळत आहे. गेले तीन हंगाम सरकारला त्यामुळेच खरेदीचे उद्दीष्ट साध्य करता आले नाही.

पेरणी सरासरीच्या पुढे

देशात मागील हंगामात गव्हाची पेरणी ३१४ लाख हेक्टरवर झाली होती. तर देशातील गव्हाचे सरासरी लागवड क्षेत्र म्हणजे मागील ५ वर्षातील लागवडीचे सरासरी क्षेत्र ३१२ लाख हेक्टर आहे. पण यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त लागवड दिसत आहे. ६ जानेवारीपर्यंत देशात ३१९ लाख हेक्टरवर गव्हाचा पेरा झाला होता. गव्हाचा पेरा वाढला असताना आणि सरकारने विक्रमी गहू उत्पादनाचा अंदाज दिला असतानाही खरेदीचे उद्दीष्ट कमी ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com