Wheat Sowing : खपली गहू पेरणी खानदेशात अल्प

Wheat Farming : खानदेशात रब्बी हंगामात खपली गहू पेरणी मध्यंतरी वाढत होती. परंतु या गव्हाची मळणीसंबंधीची किचकट व खर्चिक पद्धत आणि बाजारपेठेचा अभाव यामुळे खपलीची पेरणी कमी किंवा हवी तशी नसल्याची स्थिती आहे.
Wheat Farming
Wheat FarmingAgrowon
Published on
Updated on

Jalgoan News : खानदेशात रब्बी हंगामात खपली गहू पेरणी मध्यंतरी वाढत होती. परंतु या गव्हाची मळणीसंबंधीची किचकट व खर्चिक पद्धत आणि बाजारपेठेचा अभाव यामुळे खपलीची पेरणी कमी किंवा हवी तशी नसल्याची स्थिती आहे.

यंदा सुमारे २० एकरांत जळगाव जिल्ह्यात खपली गहू पेरणी झाल्याचा अंदाज आहे. खपली गव्हासंबंधी रावेरातील दसनूर, मस्कावद, पाल, रोझोदा, खिरोदा, यावल व जळगाव, चाळीसगाव भागांतील शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. काही शेतकऱ्यांनी या गव्हाच्या मळणीसाठी यंत्रणा आणली. परंतु अन्य शेतकरी मात्र मळणीची खर्चिक व वेळखाऊ पद्धत यामुळे त्रस्त झाले. तसेच त्यास बाजारपेठही हवी तशी मिळाली नाही. यामुळे त्याची लागवड फारशी वाढली नाही. रावेर, यावल व जळगावात काही शेतकरी त्याची पेरणी किंवा लागवड करीत आहेत.

Wheat Farming
Chana, Wheat Sowing : रब्बीत तेलबिया, धान्य पिकांची लागवड कमी; शेतकऱ्यांची गहू, भात, हरभऱ्याला पसंती

खपली गहू मळणीसाठी तंत्रशुद्ध यंत्रणेचा अभाव खानदेशात आहे. मळणीअभावी गव्हाचा उपयोगच सध्या होत नसल्याची स्थिती आहे. यामुळे मळणीसाठी तंत्रशुद्ध यंत्रणा, आवश्यक सामग्री उपलब्ध करून देण्याचा मुद्दा लाभार्थी शेतकरी उपस्थित करीत आहेत.

खपली गहू पेरणी वाढून शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी कृषी विभागाने जळगाव जिल्ह्यात सुमारे ७५ एकरात बिजोत्पादन कार्यक्रम मध्यंतरी घेतला होता. पुढील टप्प्यात जिल्ह्यात खपली गव्हाखालील क्षेत्र आणखी वाढावे, असा उद्देश यामागे होता. तसेच अनेक शेतकऱ्यांनी खपली गहू बियाणे खरेदी करून त्याची एक ते दोन एकरात पेरणी केली. धुळ्यातही पेरणी झाली होती.

Wheat Farming
Wheat Stock Limit : गव्हाचे भाव कमी करण्यासाठी स्टॉक लिमिट सरकारने केली कमी

पण मळणीसाठी जळगाव, धुळ्यात यंत्रणा नाही. घरी खाण्यासंबंधी किंवा वापरासाठी गहू तयार करण्याच्या प्रयत्न शेतकरी करीत होते. पण कृषी यंत्रणांकडून मदत, मार्गदर्शन मिळाले नाही. त्यासाठी प्रचलित गहू मळणीची यंत्रणा कुचकामी ठरते. शेतकऱ्यांनी प्रचलित किंवा ट्रॅक्टर, लहान इंजिनचलित यंत्रांद्वारे मळणी केली. पण त्यात गहू तयार झाला नाही. मळणीवरील खर्च वाया गेल्याच्या तक्रारी आहे.

मळणीसाठी राइस मिलच्या धर्तीवरची यंत्रणा विविध गावांमध्ये स्थापन करण्याची गरज आहे. मळणी व स्वच्छता व्यवस्थित न झाल्याने या गव्हाची विक्री शेतकरी करू शकत नाहीत. कारण खरेदीदारांना व्यवस्थित स्वच्छ केलेला गहू हवा असतो. या गव्हाचे दर टिकून असतात. त्याला आयुर्वेदीय मान्यता आहे. आरोग्यविषय जागरूक मंडळी त्याची मागणी नोंदवितात. पण बाजार समित्या किंवा अन्य बाजारांत त्यास उठाव नाही. यामुळे व्यावसायिकदृष्ट्या त्याची पेरणी वाढलेली नसल्याची स्थिती आहे.

मळणी यंत्रणांची गरज

खपली गव्हाचे क्षेत्र पुढे वाढवून शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यायचा असेल तर शहरे, मोठी गावे किंवा पेरणी झालेल्या क्षेत्रानजीक मळणीसाठी राइस मिलच्या धर्तीवर यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. कृषी विभागाकडून हे बियाणे पेरणी करून उत्पादन घेतलेल्या एका शेतकऱ्याने मळणीसाठी ही यंत्रणा उभारण्याची तयारी दाखविली आहे, परंतु या यंत्रणेसाठी कृषी विभागाने अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणीदेखील केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com