GM Mustard
GM MustardAgrowon

GM Mohari : जनुकीय सुधारित मोहरी वाण काय आहे?

‘सेंटर फॉर जेनेटिक मॅनिप्युलेशन ऑफ क्रॉप प्लांट'ने (सीजीएमसीपी) जनुकीय सुधारित मोहरी वाणाच्या पर्यावरणीय प्रसारणाची शिफारस केली आहे. अशी परवानगी मिळालेले मोहरी हे पहिले मानवी खाद्यातील पीक आहे.
Published on

पुणेः ‘सेंटर फॉर जेनेटिक मॅनिप्युलेशन ऑफ क्रॉप प्लांट'ने (सीजीएमसीपी) जनुकीय सुधारित मोहरी (GM Mustard Verity) वाणाच्या पर्यावरणीय प्रसारणाची शिफारस केली आहे. अशी परवानगी मिळालेले मोहरी (Mustard) हे पहिले मानवी खाद्यातील पीक (Edible Oil Crop) आहे. मात्र मोहरीला परवानगी मिळाली आणि पुन्हा जीएम पिकांविषयी (GM Crop) चर्चा रंगू लागली.

सीजीएमसीपीने डीएमएच ११ या जीएम मोहरी वाणाचे लागवडीसाठी प्रसारण होण्यापूर्वी बियाणे उत्पादन व चाचण्यांच्या हेतूने पर्यावरणीय प्रसाराची शिफारस केली आहे. ढोबळ भाषेत दोन भिन्न वाणांमधील अनुकूल जनुक एकत्रित करून जे वाण तयार केले जाते त्याला जनुकीय सुधारित वाण म्हणतात.

GM Mustard
GM Mustard : जीएम मोहरीच्या पर्यावरणीय प्रसाराला ‘जीईएसी’ ची शिफारस

पण मोहरीमध्ये हे जनुकीय बदल करणं सोपं नव्हते. कारण मोहरीच्या एकाच झाडावर नर आणि मादीची फुले असतात. त्यामुळे मोहरी हे स्वपरागीकरण करणारे पीक आहे. त्यामुळे मोहरीमध्ये जनुकीय बदल करणे आव्हानात्मक होते.

GM Mustard
GM Crop Ban : जनुकीय चाचण्यांवर सरसकट बंदी नको

दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दीपक पेंटल आणि त्यांच्या शास्त्रज्ञ गटाने डीएमएच-११ हे जनुकीय सुधारित वाण विकसित केले आहे. हे वाण विकसित करताना सध्या भारतात लोकप्रिय असलेले वरुणा वाण आणि पूर्व युरोपातील अर्ली हीरा-२ या दोन वाणांमधील जनुक वापरून डीएमएच-११ वाण विकसित करण्यात आले आहे, असे दीपक पेंटल यांनी सांगितले. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या प्रक्षेत्रांवर घेतलेल्या चाचण्यांमध्ये डीएमएच-११ या वाणाची उत्पादकता वरुणा वाणापेक्षा २८ टक्क्यांनी जास्त असल्याचे सिद्ध झाल्याचा दावाही डॉ. पेंटल यांनी केला आहे.

मोहरी वाणाच्या बाजूचे दावे ः

- शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळावे.

- डीएमएच-११ वाणाच्या सर्व चाचण्या झाल्या.

- चाचण्यांमध्ये पर्यावरणावर परिणाम दिसला नाही.

- वाणाची उत्पादकता २८ टक्क्यांनी अधिक.

- देशात खाद्यतेल उत्पादन वाढीस मदत होईल.

- आयात जीएम तेल खातो, मग जीएम पिकाला विरोध का?

- देशात जीएमची आवश्यकता आहे.

- सरकारने तातडीने डीएमएच-११ वाणाला परवानगी द्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com