Watermelon Rate : छत्रपती संभाजीनगरमध्ये कलिंगडाचे दर स्थिर

Watermelon Market : छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २३ मार्चला ६६० क्विंटल आवक झालेल्या कलिंगडाला सरासरी १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
Watermelon
WatermelonAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २३ ते २८ मार्च दरम्यान कलिंगडाची २४३० क्विंटल आवक झाली. त्यास सरासरी १००० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आवकेत चढ-उतार राहिला तरी कलिंगडाचे दर मात्र स्थिर राहिले.

छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २३ मार्चला ६६० क्विंटल आवक झालेल्या कलिंगडाला सरासरी १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २४ मार्चला आवक ३७० क्विंटल तर सरासरी दर १२५० रुपये राहिला.

Watermelon
Healthy Watermelon : आरोग्यदायी कलिंगड

मंगळवारी (ता.२६) २८९ क्विंटल आवक तर सरासरी १२०० रुपये दर मिळाला. बुधवारी (ता. २७) आवक ५१० क्विंटल तर सरासरी दर १३०० रुपये राहिला तर गुरुवारी (ता. २८) तब्बल १०६० क्विंटल आवक झालेल्या कलिंगडाचे सरासरी दर १२०० रुपये राहिले.

Watermelon
Watermelon Crop Damage : पाण्याअभावी टरबूज, खरबूज पीक धोक्यात

कैरी खातेय भाव

छत्रपती संभाजीनगरमध्ये कैऱ्यांची आवक सुरू आहे. २३ ते २८ मार्च दरम्यान विविध आंब्याच्या ४१३ क्विंटल कैऱ्यांची आवक झाली. त्यास सरासरी १७०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

चिकू सरासरी १३०० ते २३०० रुपये

छत्रपती संभाजीनगरमध्ये २३ ते २८ मार्च दरम्यान चिकूची एकूण आवक २८६ क्विंटल झाली. त्यास सरासरी १३०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com