Vegetable Market : नगरला भाजीपाल्याची आवक वाढली

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात भाजीपाल्याच्या अवकीत मोठी वाढ झाली आहे.
vegetable Market
vegetable MarketAgrowon
Published on
Updated on

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nagar APMC) मागील आठवड्यात भाजीपाल्याच्या अवकीत (Vegetable Arrival) मोठी वाढ झाली आहे. बाजार समितीत टोमॅटो (Tomato) बटाटे (Potato) कोबीला अधिक मागणी राहिली दरातही काहीशी सुधारणा झाली, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

vegetable Market
Vegetable Market : नुकसानीमुळे भाजीपाला आवक घटली

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत दर दिवसाला टोमॅटोची १६० क्विंटलपर्यंत आवक होऊन ६०० ते १६०० रुपये प्रति क्‍विंटल दर मिळाला. वांगीची ४० क्विंटलपर्यंत आवक होऊन ७०० ते २ हजार ५००, कोबीची १२५ क्विंटलपर्यंत आवक होऊन ६०० ते २५००, फ्लॉवरची ६६ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते ४ हजार, काकडीची ६० क्विंटलपर्यंत आवक होऊन ६०० ते १ हजार ८००, गवारची २५ क्विंटल आवक होऊन २ हजार ते ११ हजार, घोसाळ्याची ८ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ३ हजार ५००, दोडक्याची ३५ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ५०० ते ३ हजार ५००, कारल्याची ३६, क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ५०० ते ३ हजार ५००, भेंडीची ३४ क्विंटल आवक होऊन ८०० ते ३ हजार, वाल शेंगाची २५ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ८०० ते ३ हजार ५००, घेवड्याची ६ क्विंटलपर्यंत आवक होऊन चार ते १ हजार ५०० ते २ हजार, बटाट्याची ७०० क्विंटलपर्यंत आवक होऊन १५०० ते २३००, हिरव्या मिरचीची ५० क्विंटलपर्यंत आवक होऊन २५०० ते ३ हजार, शेवग्याची १० क्विंटल आवक होऊन २ हजार ते ७ हजार, भुईमूग शेंगाची ३ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ५ हजार, दुधीभोपळ्याचे २४ क्विंटल आवक होऊन ८०० ते १६००, गाजराची १८ क्विंटल आवक होऊन ६०० ते २०००, सिमला मिरचीची २० क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते ३ हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटल दर मिळाला आहे. पालेभाज्या मेथी, कोथिंबीर, शेपू, मुळा, चुका, चवळी,कढीपत्ता याला चांगली मागणी राहिली.

फळांची दोनशे क्विंटलची आवक

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांची दर दिवसाला दोनशे क्विंटलची आवक होत आहे. मोसंबीची दर दिवसाला ६० क्विंटल पर्यंत आवक होऊन एक हजार ते साडेतीन हजार रुपये पर्यंत दर मिळत आहे. संत्र्यांची ३५ क्विंटल पर्यंत आवक पाचशे ते साडेतीन हजार, डाळिंबाची ४० क्विंटल पर्यंत आवक होऊन १००० ते ९ हजार, सीताफळाची २५ क्विंटल पर्यंत आवक होऊन एक हजार ते पाच हजार पाचशे, पेरूची दर दिवसाला दहा क्विंटल पर्यंत आवक होऊन पाचशे ते चार हजार रुपये पर्यंत प्रत्येक क्विंटल दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com