Soybean : अमेरिकेत सोयाबीन दर स्थिरावले

जगात सोयाबीन उत्पादनात अमेरिका मागील काही वर्षांपासून आघाडीवरून दुसऱ्या स्थानावर घसरला. ब्राझीलमध्ये लागवड क्षेत्र झपाट्यानं वाढून उत्पादकताही वाढली. त्यामुळं ब्राझील सोयाबीन उत्पादनात आघाडीवर पोचला.
Soybean Rate
Soybean Rate Agrowon

पुणेः अमेरिकेतील सोयाबीन पिकाची स्थिती (Soybean Crop Condition America) बदलतेय तसा आंतरराष्ट्रीय बाजारातील दरातही (Global Soybean Rate) बदलताना दिसतोय. अमेरिकेतील काही भागांत पाऊस झाल्यानं पिकाची स्थिती सुधारू शकते, असा अंदाज व्यक्त केल जातोय. मग या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा दर (Soybean Rate) कसा राहीला? देशातील बाजारातही सोयाबीन दरात बदल झाले का? देशात सोयाबीन दराची काय स्थिती आहे? याची माहिती या व्हिडिओतून मिळेल.

Soybean Rate
Soybean : हळद, मूग, सोयाबीनमध्ये उतरता कल

जगात सोयाबीन उत्पादनात अमेरिका मागील काही वर्षांपासून आघाडीवरून दुसऱ्या स्थानावर घसरला. ब्राझीलमध्ये लागवड क्षेत्र झपाट्यानं वाढून उत्पादकताही वाढली. त्यामुळं ब्राझील सोयाबीन उत्पादनात आघाडीवर पोचला. अमेरिकेत यंदा सोयाबीन पिकाला दुष्काळाचा फटका बसतोय. त्यामुळं शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड अर्थात सीबाॅटवर सोयाबीन दर तेजीत होते. मात्र मागील आठवड्यात मध्य पश्चिम अमेरिकेत पावसाच्या सरी पडल्या वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकाला या पावसाचा फायदा होण्याची शक्यता आहे, असं अमेरिकेच्या कृषी विभागानं सांगितलं. त्यामुळं उत्पादनात काही भर पडू शकते, असा अंदाज गृहीत धरला जातोय.

Soybean Rate
Soybean : खरिपात पेरलेल्या सोयाबीनवर ‘यलो मोझॅक’ चा प्रादूर्भाव

अमेरिकेत पाऊस पडला आणि त्याचा पिकाला फायदा होऊ शकतो, असा अंदाज आल्यानंतर सीबाॅटवरील सोयाबीनमधील दीर्घकालीन वायद्यांमध्ये काहीशी घट झाली. हेज फंडांसह काही मोठ्या कंपन्यांनी आपल्या पोझिशन्स कमी केल्या. त्यामुळं सोमवारी सीबाॅटवर सोयाबीनचे वायदे स्थिरावले होते. सोमवरी सोयाबीनचे वायदे १४.०४ डाॅलर प्रतिबुशेल्सने झाले. मागील आठवड्यातील दर पातळीवर सोयाबीन स्थिर आहे. मात्र उत्पादनवाढीच्या शक्यतेनं दीर्घकालीन पोझिशन्स कमी झाल्या.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार सुरु आहेत. मात्र देशातील सोयाबीन बाजार एक भावपातळीवर स्थिरावलाय. मागील दोन महिन्यांपासून सोयाबीनला ६ हजार ते ६ हजार ३०० रुपये दर मिळतोय. देशात सोयाबीनच्या वायद्यांवर बंदी असल्यानं भविष्यातील दराविषयीचा अंदाज येत नाही. तसचं बाजार सुरु झाल्यानंतरच त्या दिवसाचे दर कळतात. त्यामुळं सोयाबीनची खरेदी-विक्री आवश्यकतेनुसार होतेय. यंदा देशातील कमी सोयाबीन गाळप आणि त्यामुळं सायोबीनची अधिक उपलब्धता तसंच सोयापेंडची कमी निर्यात, यामुळं सोयाबीन बाजार दबावात असल्याचं जाणकारांनी सांगितलं.

राज्यातील महत्वाच्या लातूर बाजार समितीत सोयाबीनला ६ हजार ते ६ हजार ३०० रुपये दर मिळाला. तर अकोला बाजारात ५ हजार ८०० ते ६ हजार रुपयाने व्यवहार होत आहेत. तर मध्य प्रदेशातील सर्वांत मोठ्या इंदोर बाजार समितीत सोयाबीनला ६ हजार ते ६ हजार ३५० रुपये दर मिळतोय. या बाजारांमध्ये सध्याच्या दराभोवतीच बाजार फिरतोय. मागील काही दिवसांत सोयाबीन दरात फार वाढ किंवा घट झालेली नाही. नवीन हंगामातही सोयाबीन दर या पातळीवर राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com