US Mango Rejection: समन्वयाअभावी अमेरिकेने नाकारले आंब्यांचे कंटेनर

Mango Market Update: भारतीय आंब्यांचे काही कंटेनर अमेरिकेने नाकारले असून यामागे निर्यात प्रक्रिया आणि संबंधित यंत्रणांमध्ये झालेला समन्वयाचा अभाव कारणीभूत ठरला आहे. यामुळे शेतकरी आणि निर्यातदार चिंतेत आहेत.
Mango Export
Mango ExportAgrowon
Published on
Updated on

Pune News: अमेरिकेच्या निर्यात निरीक्षकाने आंबा निर्यात प्रक्रियेमधील विकिरण उपचारांमधील काही त्रुटी थेट अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना न सांगता राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या असत्या, तर २५ टन आंब्याचे नुकसान टाळता आले असते, अशी भूमिका पणन मंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय कदम यांनी मांडली आहे.

अमेरिकेत आंबा निर्यात करताना, झालेल्या करारामधील तरतुदींनुसार विकिरण प्रक्रियेमध्ये काही त्रुटी आढळल्यास, त्या त्रुटी सुविधा केंद्राच्या निदर्शनास आणून देण्याबाबत व त्रुटी दुरुस्त करण्याबाबत त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी तरतूद आहे. मात्र हा नियम न पाळता अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना त्रुटी सांगून आंबा निर्यात नाकारल्याचा प्रकार घडला. याची चौकशी सुरू असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.

Mango Export
Canning Mango Price: कॅनिंगसाठी आंब्याला २८ ते ३० रुपये दर

याबाबतची माहिती अशी, की ८ व ९ मे रोजी निर्यात झालेल्या निर्यातीच्या खेपेतील (कन्साइन्मेंट) त्रुटींमुळे अमेरिकेने सुमारे २५ टन आंबा नाकारला. निर्यात सुविधा केंद्रांवर ८, ९ मे रोजी वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रावरील विकिरण प्रक्रियेची स्काडा संगणकीय प्रणालीतील माहितीची तपासणी केली असता किमान व कमाल डोस हा विहित मर्यादेमध्ये आढळून आला.

आंब्यावरील विकिरण प्रक्रिया व्यवस्थितरीत्या, परिणामकारक व नियमानुसार पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर अमेरिकन निरीक्षकांनी तपासणी व खात्री करून, डोझिमीटरचे रीडिंगमधील किमान व कमाल डोस हा विहित मर्यादेत योग्य असल्यामुळे निर्यातीकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र-२०३ स्वाक्षरीत करून दिलेले आहे. त्यानंतरच अमेरिकेला आंबा निर्यात खेपा पाठविल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.

Mango Export
Latur Mango Festival : हंगाम संपत आल्यानंतर लातुरात आंबा महोत्सव

अमेरिकेमध्ये पोहोचलेल्या १५ आंबा खेप डोजीमेट्रीमध्ये काही त्रुटी आहेत असे कळविल्यामुळे १० निर्यातदारांच्या एकूण २५ टन कन्साइन्मेंट नाकारण्यात आल्या. मात्र प्रक्रिया संदर्भातील युएसडीए, एनपीपीओ व अपेडा यांच्या दरम्यान स्वाक्षरीत झालेल्या ‘ऑपरेशनल वर्क प्लॅन’ मधील तरतुदीनुसार विकीरण प्रक्रियेमध्ये त्रुटी आढळल्यास, त्याबाबतच्या त्रुटी सुविधा केंद्राच्या निदर्शनास आणून देणेबाबत व त्रुटी दुरुस्त करण्याबाबत त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात येईल असे स्पष्ट असताना,

अमेरिकन निरीक्षकांनी असे न करता, इतर संबंधित यंत्रणांशी विचारविनिमय न करता थेट त्यांच्या अमेरिकेमधील वरिष्ठ कार्यालयास कथित त्रुटींबाबत सांगितले. त्यामुळे सदर १५कन्साइन्मेंट अमेरिकेमध्ये नाकारण्यात आल्या. असेही डॉ. कदम यांनी स्पष्ट केले. अमेरिका आंबा निर्यातीसाठीच्या ‘प्री-क्लिअरन्स प्रोग्रामचे संचालिका इरीका ग्रोवर यांनी १० मे रोजी दिलेल्या ई-मेलमध्ये सूचित केल्याप्रमाणे सुविधा केंद्रप्रमुख यांनी केलेल्या उपाययोजनांचा अहवाल यूएसडीएच्या विहित नमुन्यांमध्ये ११ मे रोजी सादर करण्यात आला असून, त्याआधारे त्याच दिवसापासून अमेरिकेला आंबा निर्यातीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

यंदा १८५ टन अमेरिकेला निर्यात

यंदा वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रावरून १,४१३ टन आंब्यांची अमेरिका येथे निर्यात झाली असून, सुमारे २ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर, ११ ते १८ मे दरम्यान सुमारे ३९ खेपेंद्वारे ५३ हजार ७२ बॉक्सेस सुमारे १८५ टन आंबा अमेरिकेला निर्यात करण्यात आला. विविध आंब्यांमध्ये महाराष्‍ट्रातील हापूस, केशर, पायरी, तर दक्षिण भारतामधील बैगनपल्ली, हिमायत आंब्यांची निर्यात सुरू आहे. उत्तर भारतामधील रसालू, लंगडा, चौसा, दशहरी आंबे देखील विकीरण प्रक्रिया करून निर्यात सुरळीत सुरू असल्याचे पणन मंडळाचे निर्यात विभागप्रमुख सतीश वराडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com