
Washim News : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद परिषद व चिया खरेदीचा रविवारी (ता. २३) प्रारंभ झाला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक श्यामराव उगले पाटील होते.
या कार्यक्रमाला सभापती विष्णूपंत भुतेकर, दिलीप काटमळे, कृषी अधिकारी मगनदास तावरे, सहायक निबंधक भास्कर मोरे, महेश गाढवे, संचालक गजानन पाचरणे, ॲड.गजानन अवताडे, पुरुषोत्तम तोष्णीवाल, गोपाल काबरा, भैय्यासाहेब देशमुख, भाऊराव गरड, रमेश गायकवाड, रामचंद्र बुधनेर, संजय पवार, किशोर कोठुळे, विठ्ठल नरवाडे, मदनशेठ बगडिया, केशव भगत, डॉ. मुक्तार देशमुख, सचिव विजयराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सभापती विष्णूपंत भुतेकर यांनी सांगितले, रिसोड तालुक्यात हळद उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेत असून त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून बाजार समितीने मागील अनेक वर्षापासून व्यवहार सुरु केले. त्याचा फायदा हळद उत्पादकांना झाला आहे.
चियाची सुद्धा खरेदी बाजार समितीने सुरू केली असून याचा फायदा चिया उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. या वेळी केव्हीकेचे विषयतज्ज्ञ निवृत्ती पाटील व दिलीप कटमले यांनी शेतकऱ्यांना हळद उत्पादनाविषयी मार्गदर्शन केले. हळदीचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.