Turmeric Rate: बाजारपेठेत हळदीची मागणी वाढली, दर स्थिर राहण्याचा अंदाज

Market Update: सांगली आणि सातारा जिल्ह्यात हळदीची काढणी वेगाने सुरू असून, बाजारपेठेत मागणी वाढल्याने हळदीचे दर टिकून आहेत. येत्या १५ दिवसांत आवक वाढेल, परंतु दर स्थिर राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.
Turmeric Market
Turmeric MarketAgrowon
Published on
Updated on

Sangli News: सांगली आणि सातारा जिल्ह्यांत सध्या हळद काढणीला गती आली आहे. त्यामुळे बाजार समितीत हळदीची आवक हळूहळू वाढू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीचे दर टिकून आहेत. हंगामाच्या प्रारंभापासून हळदीला चांगले दर मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिसाला मिळाला आहे. येत्या पंधरा दिवसांत हळदीची आवक वाढणार असून हळदीचे दर स्थिर राहतील, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

यंदाच्या हंगामातील हळद विक्री सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. बाजार समितीत हळदीची मागणीही वाढू लागली असल्याने आवकही वाढू लागली आहे. हळदीला चांगले दर मिळत असल्याने विक्रीसाठी पुढे येत असल्याचे चित्र आहे. नवीन हळदीचे सौदे सुरू झाल्यानंतर सात दिवसांनंतर हळदीच्या दरात प्रति क्विंटलला ३०० रुपयांची वाढ झाली होती. गेल्या आठवड्यापासून हळदीचे दर टिकून आहेत.

Turmeric Market
Turmeric Farming : हळद काढणी, प्रतवारीवर भर

दरम्यान, सांगली, सातारा जिल्ह्यांतील हळदीची काढणीला गती आली आहे. बाजारपेठेतील दराची स्थिती पाहूनच शेतकरी हळद विक्रीसाठीचे नियोजन करत आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यातील हळद काढणीचे नियोजन शेतकरी करु लागला आहे. या महिन्याच्या अखेरीपासून परपेठ (परराज्य) हळदीची आवक सुरू होण्याची शक्यता आहे.

Turmeric Market
Turmeric Research Center : वसमत हळद संशोधन केंद्राचे सांगलीत उपकेंद्र उभारणार

बाजार समितीतील हळद आवक व विक्री (पोती)

तारीख.... आवक... विक्री...

१० फेब्रुवारी .....४८६३...१८४०

११ फेब्रुवारी...२४४६...१०६५

१३ फेब्रुवारी...५२३०...५६१

१४ फेब्रुवारी...३३७१....११८५

१७ फेब्रुवारी....७१३३....६०७

१८ फेब्रुवारी...८४०२....३१७

प्रतवारीनुसार हळदीचे दर (प्रति क्विंटलमध्ये)

कणी : १३००० ते १३५००

पावडर क्वालिटी : १३८०० ते १४२००

मध्यम : १५००० ते १५५००

लगडी : १८५०० ते २००००

बाजारात हळदीची आवक वाढू लागली असून उठावही चांगला आहे. त्यामुळे हळदीचे दर टिकून आहेत. येत्या पंधरा दिवसांनंतर हळदीची आवक वाढेल.
गोपाळ मर्दा, हळद व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com