Turmeric Rate: हिंगोलीत हळद दरात घट

Hingoli APMC Update: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमधील हळद दरात घट झाली आहे. कमाल दर १३ हजार रुपयांपेक्षा कमी तर किमान दर ११ हजार रुपयांपेक्षा कमी झाले आहेत.
Turmeric
TurmericAgrowon
Published on
Updated on

Hingoli News: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमधील हळद दरात घट झाली आहे. कमाल दर १३ हजार रुपयांपेक्षा कमी तर किमान दर ११ हजार रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. शुक्रवारी (ता. १८) हळदीची २१९५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान १०,१०० ते कमाल १२,६०० रुपये, तर सरासरी ११,३५० रुपये दर मिळाले.

२ जुलैपर्यंत हळदीला कमाल १३ हजार रुपयापर्यंत दर मिळाले. परंतु त्यानंतर दरात ४०० ते ५०० रुपयांची घट झाली आहे. किमान १५ हजार रुपये दर मिळतील या अपेक्षेने हळद साठवूण ठेवलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Turmeric
Turmeric Market : नांदेडला हळदीचे चुकारे थकल्याने लिलाव पाडले बंद

मागील आठवड्यात संत नामदेव हळद मार्केटमधील हळदीच्या आवकेत वाढ झाली. शुक्रवार (ता. ११) ते शुक्रवार (ता. १८) या कालावधीत हळदीची प्रतिदिन १८५० ते २४०० क्विंटलनुसार एकूण १२ हजार ४०६ क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल १०,००० ते १२,७५५ रुपये दर मिळाले.

हरभरा, सोयाबीन दरात सुधारणा

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात हरभरा दरात ५०० ते ६०० रुपयांनी तर सोयाबीनच्या दरात १५० रुपयांनी सुधारणा झाली. शुक्रवारी (ता. १८) हरभऱ्याची १५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५,६९० ते कमाल ६,१७५ रुपये, तर सरासरी ५,९३२ रुपये दर मिळाले.

Turmeric
Turmeric GI : वसमत हळद जीआय टॅगसाठी ई-पीक पेरा नोंद आवश्यक

सोयाबीनची ९०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४,०५० ते कमाल ४,४०० रुपये, तर सरासरी ४,२२५ रुपये दर मिळाले. ज्वारीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १,३०० ते कमाल २,१०० रुपये तर सरासरी १,७०० रुपये दर मिळाले. गव्हाची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २,४५० ते २,८४५ रुपये दर मिळाले.

संत नामदेव हळद मार्केट हळद दर स्थिती

(आवक क्विंटलमध्ये, दर रुपयांत)

तारीख आवक किमान कमाल सरासरी दर

११ जुलै २,४०० १०,६४० १२,६४० ११,६४०

१४ जुलै २,२०० १०,७५५ १२,७५५ ११,७५५

१५ जुलै १,८६१ १०,००० १२,५०० ११,२५०

१६ जुलै १,९०० १०,००० १२,५०० ११,२५०

१७ जुलै १,८५० १०,५०० १२,७०० ११,६००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com