Turmeric Market : हळद दरात किंचित सुधारणा

Turmeric Rate : गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वायदे बाजारात हळदीच्या दरात घट झाली आहे. गेल्या चाळीस दिवसांत प्रति किलोस २० रुपयांनी दर कमी झाले होते.
Turmeric Market
Turmeric Market Agrowon
Published on
Updated on

Sangli News : गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वायदे बाजारात हळदीच्या दरात घट झाली आहे. गेल्या चाळीस दिवसांत प्रति किलोस २० रुपयांनी दर कमी झाले होते. मात्र वायदे बाजारात हळदीच्या दरात सोमवारी (ता. १७) पाच रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच हळदीचा मोठ्या प्रमाणात उठावही होत असून दरात फारशी तेजी मंदी राहण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

देशातील बाजारपेठेत हळदीची आवक सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी आवकही वाढली आहे. परिणामी वायदे बाजारात दरात घसरण होवू लागली आहे. त्याचा हळदीच्या दरावर परिणाम झाला. गेल्या चाळीस दिवसांत प्रति क्विंटलला तब्बल दोन हजार रुपयांनी दर कमी झाले असल्याचे हळद उद्योगातील जाणकारांनी सांगितले आहे. दरम्यान, वायदे बाजारात हळदीचे दर प्रति किलोस पाच रुपयांनी वाढले असल्याने दरात किंचित सुधारणा झाली आहे.

Turmeric Market
Turmeric Production : देशात हळदीचे उत्पादन ८० हजार टनांनी घटण्याची शक्यता

सद्यःस्थितीत सांगली, सातारा जिल्ह्यांसह कर्नाटकातील शेतकरी हळद विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे हळद विक्रीला गती आली आहे. सांगली बाजार समितीत दररोज हळदीची २५ ते ३० हजार पोती (एक पोते ५० किलोचे) विक्रीस येत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत हळदीला मागणी असल्याने उठावही चांगला होत आहे.

यंदाच्या हंगामातील नवीन हळद फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून विक्रीला येवू लागली. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हळदीच्या दरात प्रति क्विंटल ३०० रुपयांनी वाढ झाली होती. फेब्रुवारीअखेर हळदीचे दर टिकून होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

गेल्या पंधरा दिवसांपासून बाजार समितीत हळदीची आवक वाढली आहे. मार्च महिन्यापासून आवक वाढली जाते. त्यामुळे दिवसातून दोन वेळा हळदीचे सौदे केले जात आहेत. सांगलीतील हळदीच्या दरावरून इतर बाजारपेठेतील हळदीचे दर ठरले जातात. वायदे बाजारात हळदीच्या दरात घसरण सुरू झाली. त्यामुळे चाळीस दिवसांत दर प्रति क्विंटल दोन हजार रुपयांनी कमी झाले आहेत.

Turmeric Market
Turmeric Seed Storage : शास्त्रोक्त पद्धतीने हळद बेणे साठवणूक

वास्तविक पाहता, हळदीचे दर हळूहळू कमी झाले. दरम्यान, पुन्हा वायदेबाजारात हळदीच्या दरात किंचित सुधारणा झाल्याने हळदीला प्रति किलोस ५ रुपयांची वाढ झाली आहे. बसमत, इरोड यासह अन्य भागात हळदीची विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे सांगलीसह अन्य बाजारपेठेत आवक वाढणार आहे. त्यामुळे हळदीच्या दरात फारशी तेजी-मंदी राहण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हळदीचे दर प्रति क्विंटलमध्ये

पावडर क्वालिटी ः १२,२०० ते १३,८००

मध्यम ः १३,२०० ते १३,७००

मोठा माल ः १६,००० ते १७,०००

लगडी ः १८,००० ते २१,०००

देशभरातील बाजारपेठेत हळदीची आवक सुरू झाली असून हळदीचे दर कमी अधिक होत आहेत. सध्या हळद दरात प्रति किलोस पाच रुपयांनी वाढ झाली आहे. उठावही चांगला आहे. एकंदर यंदाच्या हंगामात दर टिकून राहतील असे चित्र आहे.
- गोपाळ मर्दा,हळद व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com