Turmeric : हिंगोली जिल्ह्यात ३४ हजार हेक्टरवर हळद लागवड

अनेक भागात हळद लागवडीस थोडा विलंब झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा लागवड क्षेत्र कमी होऊ शकते.
Turmeric
TurmericAgrowon

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात या वर्षी (२०२२) सोमवारी (ता. २५) पर्यंत ३४ हजार २३० हेक्टर हळद लागवड (Turmeric Cultivation) झाली आहे. अनेक भागात हळद लागवडीस (Turmeric Production) थोडा विलंब झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा लागवड (Turmeric Acreage) क्षेत्र कमी होऊ शकते.

Turmeric
औरंगाबाद झाले संभाजीनगर, उस्मानाबाद धाराशिव ! हिंगोलीत हळद संशोधन केंद्र

हळद लागवडीसाठी २५ मे ते १५ जून हा कालावधी योग्य मानला जातो. सिंचनासाठी पाणी असलेले शेतकरी या कालावधीत लागवड करतात. परंतु यंदा जिल्ह्यातील अनेक भागांत जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवडीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे हळद लागवडीस उशीर झाला. अन्य पिकांच्या तुलनेने किफायतशीर ठरत असल्यामुळे गेल्या काही वर्षांत हिंगोली जिल्ह्यात हळद लागवडीखालील क्षेत्राचा मोठा विस्तार झाला आहे.सर्व पाच तालुक्यांतील शेतकरी हळदीकडे वळले आहेत. दरवर्षी लागवड क्षेत्रात वाढ होत आहे.

Turmeric
शेतकरी नियोजन पीक: हळद

जिल्ह्यातील २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांतील हळदीचे सरासरी क्षेत्र ४१ हजार हेक्टर एवढे आहे. २०२० मध्ये ४१ हजार ५३८ हेक्टरवर हळद लागवड झाली होती. गतवर्षी (२०२१) ४९ हजार ७६४ हेक्टर लागवड झाली होती. यंदा जिल्ह्यात ५६ हजार हेक्टरवर हळद लागवड प्रस्तावित आहे. उत्पादन खर्च आणि उत्पन्न या बाबतीत खरिपात सोयाबीन, तर रब्बीमध्ये हरभरा ही पीक पद्धती फायदेशीर ठरत असल्याचा अनेक भागांतील शेतकऱ्यांचा अनुभव आहे. हळदीचा उत्पादन खर्च वाढला आहे. विविध कारणांनी उत्पादकता कमी येत आहे. बाजारभावात देखील फारशी तेजी नाही. त्यामुळे यंदा हळदीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता दिसत आहे. कृषी विभागाकडून क्षेत्र अंतिम करण्यात आल्यानंतर हळदी खालील एकूण लागवड क्षेत्रात यंदा घट किंवा वाढ झाल्याचे स्पष्ट होईल.

सोयाबीनचा पेरा वाढल्यामुळे यंदा तालुक्यातील हळदीचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे.
गोविंद कल्याणपाड, तालुका कृषी अधिकारी, वसमत
गतवर्षी अतिपावसामुळे हळदीमध्ये कंदसड झाली. उत्पादन कमी झाले. यंदा अनेक भागांत लागवडीस विलंब झाला. परिणामी, हळदीची उत्पादकता कमी येऊ शकते.
अनिल ओळंबे, उद्यानविद्या विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर, जि. हिंगोली

तालुकानिहाय हळद लागवड स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका. . . हळद लागवड क्षेत्र

हिंगोली. . . ४७३३

कळमनुरी. . . ६५७०

वसमत. . . १०६५१

औंढा नागनाथ. . . ७५८०

सेनगाव. . . ४६९६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com