Maize Price: मका हमीभावापेक्षा कमी दरात! शेतकऱ्यांना मोठा फटका

Maize Market Crash: खानदेशातील बाजारात मक्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे. मात्र, हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शासकीय खरेदी तातडीने सुरू करण्याची गरज आहे.
Maize
MaizeAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News: खानदेशात बाजारात मक्याची आवक सुरू झाली आहे. परंतु मक्याचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शासकीय खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

मक्याची लागवड खानदेशात ज्वारीपेक्षा अधिक झाली आहे. ही लागवड सुमारे दीड लाख हेक्टरवर झाली आहे. यात आगाप लागवडीच्या मक्याची मळणी पूर्ण झाली आहे. तर अनेक शेतकऱ्यांचा मका पुढील १० दिवसांत मळणीवर येईल. बाजारात आगाप लागवडीच्या मक्याची मळणी पूर्ण होऊन आवक सुरू झाली आहे. त्याचे दर १८०० ते २००० रुपये प्रति क्विंटल एवढे आहेत. हे दर परवडणारे नाहीत.

Maize
Maize Production : चांगल्या पावसामुळे गहू, मका उत्पादनात वाढ

कारण मक्याला एकरी किमान १५ ते २० हजार रुपये खर्च आला आहे. एकरी उत्पादन २५ ते २७ क्विंटल आहे. यामुळे फारसा नफा मका उत्पादकांच्या हाती राहत नसल्याची स्थिती आहे. खर्चाच्या तुलनेत पीक परवडायला हवे. कारण पाच महिन्यांचे हे पीक आहे. कापणी, मळणीचा एकरी खर्च ३५०० रुपये एवढा आहे. बाजारात आवक अधिक वाढण्याची स्थिती तयार होत आहे. यामुळे पुढे नुकसानही अधिकचे होईल.

यामुळे शासकीय खरेदी एप्रिलमध्येच सुरू करण्याची गरज आहे. जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा येथील बाजारात मक्याची आवक अधिक होत असते. यातील काही बाजारात उधारीने मक्याची विक्री शेतकऱ्यांना करावी लागत आहे. उठाव कमी आहे, अशी बतावणी खरेदीदार करीत आहेत. चार ते पाच दिवस उधारीवर मक्याची विक्री करावी लागत आहे. यात शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यतादेखील आहे. या स्थितीत शासकीय खरेदी तातडीने सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.

Maize
Agrowon Podcast: तुरीचे भाव हमीभावापेक्षा कमीच; आले, पपई, कापूस तसेच काय आहेत सोयाबीन भाव?

खानदेशात आवक वाढली

खानदेशात मका आवक मागील सात ते आठ दिवसांत वाढली आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, पाचोरा व जळगाव या बाजारांत मिळून रोज १० ते १२ हजार क्विंटल मक्याची आवक होत आहे. धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारमधील नंदुरबार, शहादा येथील बाजार समितीतही मका आवकेत सतत वाढ होत आहे.

आवक पुढील आठवड्यात किंवा पावसाळी वातावरण निवळल्यानंतर आणखी वाढेल. कारण मका मळणीस आणखी वेग येईल. यामुळे बाजारातील आवकेत वाढ होईल, अशी माहिती आहे. यामुळे दरांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com