Red Chili Market News: नंदुरबारच्या लाल मिरचीचा ठसका

Red Chili Production : लाल मिरचीसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबारच्या बाजारात यंदा आवकही अधिक राहिली.
Red Chili Market
Red Chili MarketAgrowon
Published on
Updated on

Red Chili Market Update : लाल मिरचीसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबारच्या बाजारात यंदा आवकही अधिक राहिली. तसेच सरासरी दरही पाच हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. मिरचीची आवक सध्या अल्प आहे. यंदाचा हंगाम मात्र शेतकऱ्यांसाठी बऱ्यापैकी राहिला, असे चित्र आहे.

नंदुरबारात मिरचीची लागवड यंदा सुमारे अडीच हजार हेक्टरवर स्थिर होती. मागील हंगामात लागवड सुमारे दीड हजार हेक्टरवर होती. तसेच उत्पादनही कमीच राहीले. यंदा हिरव्या मिरचीचेदेखील चांगले उत्पादन हाती आले.

हिरव्या मिरचीची थेट खरेदी अनेक खरेदीदारांनी करून तिची आखातात पाठवणूक केली. एकरी २०० ते २५० क्विंटल एवढे हिरव्या मिरचीचे उत्पादन अनेकांनी मिळविले. हिरव्या मिरचीला सरासरी ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला.

Red Chili Market
Red Chili Rate : सोलापुरात लाल मिरचीच्या दराचा ठसका वाढला

सुरुवातीला काहींना ४० ते ४२ रुपये प्रतिकिलोचा दरही मिळाला. मध्यंतरी दर २५ रुपये प्रतिकिलो, असेही होते. हिरव्या मिरचीची काढणी ऑगस्ट ते फेब्रुवारीदरम्यान सुरू होती. यानंतर ओल्या लाल मिरचीला दर चांगले होते. हे दर प्रतिक्विंटल कमाल १० हजार रुपये एवढा होता.

यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हिरव्या मिरचीची काढणी बंद करून ओल्या लाल मिरचीसाठी क्षेत्र राखले. मागील हंगामात ओल्या लाल मिरचीला प्रतिक्विंटल कमाल पाच व किमान दोन हजार रुपये दर होता.

यंदा मात्र दर चांगले मिळाले. फेब्रुवारीत ओल्या लाल मिरचीचा हंगाम सुरू झाला. मार्च व एप्रिलमध्ये ओल्या लाल मिरचीचा हंगाम जोमात सुरू होता. नंदुरबारात सुमारे १३ खरेदीदारांनी ओली लाल मिरची वाळविण्यासाठी पथारी किंवा मोठे खळे तयार केले होते.

Red Chili Market
Red Chili Market : लाल मिरचीला दरातील तेजीचा ठसका

मार्चमध्ये होती चांगली आवक

ओल्या लाल मिरचीची पाठवणूक नंदुरबार बाजार समितीत शेतकऱ्यांनी केली. बाजारात मार्चमध्ये ही आवक चांगली राहिली. ही आवक मार्चमध्ये प्रतिदिन सरासरी १० ते ११ हजार क्विंटलवर होती. आठवड्यातून तीन दिवस ही आवक अधिक राहायची. एप्रिलमध्ये आवक कमी होत गेली.

सुरुवातीला लाल मिरचीला प्रतिक्विंटल १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर होता जशी आवक वाढली, तशी दरातही घसरण सुरू झाली. अखेरीस दर साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल, असा मिळाला. एप्रिलमध्ये ओल्या किंवा लाल मिरचीचा हंगाम अपवाद वगळता संपुष्टात आला.

कोट्यवधींची उलाढाल

यंदा नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीच्या खरेदी - विक्रीतून सुमारे ११० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. ही उलाढाल यंदा वाढली. कारण आवक अधिक होती.

नंदुरबार बाजार समिती लाल मिरचीसाठी उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. काही शेतकऱ्यांनी दोंडाईचा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथेही लाल मिरचीची पाठवणूक केली. तेथेही बऱ्यापैकी उलाढाल झाली.

नंदुरबार बाजार समितीमधील लाल मिरचीची आवक (आवक क्विंटलमध्ये)

वर्ष---आवक

२०२०-२१---एक लाख ५५ हजार

२०२१-२२---पावणेदोन लाख

२०२२-२३---दोन लाख २५ हजार

लाल मिरचीचे दर बऱ्यापैकी दिसत असल्याने मी यंदा ओल्या लाल मिरचीसाठी हिरव्या मिरचीची काढणी थांबविली. पीक यंदा परवडले. कारण सुरुवातीला आठ ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर वाळविलेल्या लाल मिरचीस मिळाला. अखेरीस दर साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल, असे होते. तर सरासरी साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर राहिला. एप्रिलमध्ये आमचा ओल्या लाल मिरचीचा हंगाम संपुष्टात आला.
- सुरेश पटेल, मिरची उत्पादक, लोंढरे, ता. शहादा, जि. नंदुरबार
हिरव्या मिरचीचे दर यंदा कमी अधिक होते. कारण आवक अधिक राहिली. आम्ही तिची पाठवणूक आखातात केली. नंतर शेतकऱ्यांनी ओल्या लाल मिरचीचे उत्पादन घेणे पसंत केले. कारण लाल मिरचीला यंदा चांगले दर मिळाले.
- योगेश पटेल, मिरचीचे खरेदीदार, पिंपळोद, ता.निझर, जि. तापी, गुजरात

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com