Onion Market : उन्हाळ कांद्याच्या दरात मागणीमुळे सुधारणा

Summer Onion Rate : चालूवर्षीही उन्हाळ कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी अपेक्षित परतावा मिळत नसल्याची स्थिती आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Nashik News : चालूवर्षीही उन्हाळ कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी अपेक्षित परतावा मिळत नसल्याची स्थिती आहे. आता मात्र देशांतर्गत व आखाती देशात मागणी वाढली आहे.

त्यामुळे गेल्या सप्ताहाच्या तुलनेत २६ ते ३० जूनदरम्यान जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, लासलगाव अशा प्रमुख बाजार आवारांमध्ये कांद्याची आवक वाढल्याचे दिसून आले.

आवक वाढती असतानाही क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांनी सुधारणा दिसून आली. मात्र काही ठिकाणी दरात वाढ झाली असली तरी उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहेत.

चालू वर्षी वादळी वाऱ्यासह पाऊस, तर काही ठिकाणी गारपिटीमुळे काढणीच्या अवस्थेतच कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांदा साठवण केल्यानंतर सडू लागला आहे. हे त्यामुळे आता हळूहळू चांगला कांदा शेतकरी गरजेनुसार विकत आहेत. मात्र कांद्याच्या प्रतवारीनुसार शेतकऱ्याला सध्या दर मिळत आहेत.

Onion Market
BRS Onion Rate Telangna : बीआरएसच्या तेलंगणा मॉडेलचं पितळ उघडं; नेतेच करतायत शेतकऱ्यांची दिशाभूल?

गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीला पिंपळगाव बसवंत बाजारात प्रतिक्विंटल सरासरी दर ७३० रुपये होते. मात्र दुसऱ्या सप्ताहात १००० रुपयांचा टप्पा ओलांडला. मात्र त्यानंतर दरात चढ-उतार दिसून आली. शेवटच्या आठवड्यात दरात सुधारणा होऊन १५०० रुपयांचा दर मिळाला. त्यामुळे मिळणारे दर दुप्पट झाल्याची स्थिती आहे.

लासलगाव बाजारात सुरुवातीला सरासरी दर ८३० रुपये होते. दुसऱ्या आठवड्यात १००० रुपयांचा टप्पा ओलांडला. मात्र ते दर टिकून होते. शेवटच्या आठवड्यात दरात सुधारणा होऊन १४२५ रुपये दर मिळाला. जुलैमध्ये पहिल्याच दिवशी १५०० रुपयांचा दर मिळाला. यंदा दक्षिण भारतातील कांदा उत्पादक पट्ट्यात लागवडी लांबणीवर गेल्या आहेत. त्यामुळे कांद्याचा तुटवडा जाणवणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे हे भाव वाढत जातील अशी चिन्हे आहेत.

Onion Market
Onion Market : खानदेशात कांदा दरात सुधारणा; आवक स्थिर

दर वाढीची काही कारणे :

- मध्य प्रदेशामध्ये आवक तुलनेने कमी; माल खराब येत असल्याची स्थिती

- देशांतर्गत विविध राज्यांत बाजारात वाढती मागणी

- आखाती देशांमध्ये कुवेत, ओमान व दुबईच्या बाजारात मागणी

आठवड्याच्या अखेरीस आवक व दराची तुलनात्मक स्थिती :

बाजार समिती...आवक/सरासरी दर (२४ जून)...

आवक/सरासरी दर (३० जून)... दरातील वाढ (प्रतिक्विंटल-रुपये)

पिंपळगाव बसवंत...१७,४१८/१,०५०...३८,७५०/१,५००...४५०

लासलगाव....१९,४८२/१,०५०...२६,७२८/१,४२५...३७५

विंचूर (लासलगाव)...१९,६४०/१,०००...२१,१५०/१,३५१...३५१

येवला...५,७७९/८५०...८,९२१/१,३००....४५०

मनमाड...२,०६४/८७५...५,५००/१,२००....३२५

(संदर्भ : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

Onion Market
Onion Market : खानदेशात कांदा दरात सुधारणा; आवक स्थिर

आवक व दर स्थिती : (ता.१ जुलै रोजी)

बाजार समिती...किमान...कमाल....सरासरी

पिंपळगाव बसवंत...८००...२,४०२...१,४२५

लासलगाव...१,५००...२,६००

विंचूर...५००...१,६००...१,३५०

येवला...३००...१,५११...१,३५०

सिन्नर...३००...१,४३६...१,१५०

चांदवड...४००...१,६५३...१,३००

(संदर्भ : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याचे आधीच नुकसान झाले आहे. त्यात दरात सुधारणा दिसून आली आहे. मात्र हाती आलेले उत्पादन व सध्या मिळणारा दर यांचे गणित बसत नाही. किमान उत्पादन खर्च वसूल होईल. त्यामुळे दोन हजारांहून अधिक दर मिळाला पाहिजे.
- अजय पवार, कांदा उत्पादक, नवी बेज, ता. कळवण
सध्या बाजारात हळूहळू मागणी वाढू लागली आहे, याशिवाय बाहेरच्या राज्यातील कांदा खराब येत असल्याने राज्यातील कांद्याला पसंती आहे. त्यातच आखाती देशांमध्ये मागणी असल्याने सध्या उठाव आहे. गुणवत्तेचा मालाची आवक होत असून त्याप्रमाणे प्रतवारीनुसर चांगले दर सध्या मिळत आहेत.
- मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव, ता. निफाड
एकादशीमुळे दोन-तीन दिवस आवक कमी होती. याशिवाय राज्याच्या बाहेर कांदा जात आहे. तर बांगलादेशमध्ये ही निर्यात वाढल्याने दर सुधारले. मात्र उत्तर भारतात श्रावण महिन्यात मागणीवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे.
- सुनील ठक्कर, कांदा व्यापारी व निर्यातदार, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com