Onion Market : खानदेशात कांदा दरात सुधारणा; आवक स्थिर

Onion Rate : खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणा होत असून, दर धुळे, जळगावच्या प्रमुख बाजारात प्रतिक्विंटल १००० रुपयांपर्यंत पोचले आहेत.
onion
onionagrowon

Jalgaon News : खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणा होत असून, दर धुळे, जळगावच्या प्रमुख बाजारात प्रतिक्विंटल १००० रुपयांपर्यंत पोचले आहेत.

कांद्याचे दर एप्रिल, मेच्या अखेरीस प्रतिक्विंटल ५०० रुपये, एवढे होते. त्यात हळूहळू सुधारणा सुरू झाली.

onion
Telangana Onion Rate : ‘बीआरएस’च्या कांदेदराबाबत दाव्याची शेतकऱ्याकडून पोलखोल

आता बाजार समित्यांत उठाव असल्याने कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे. जूनच्या सुरवातीला प्रतिक्विंटल किमान ३०० व कमाल दर ६०० रुपये प्रतिक्विंटल होते. तर गेल्या आठवड्यात दरात सुधारणा होऊन कमाल दर ९०० रुपयांवर पोचले आहेत.

onion
BRS Onion Rate Telangna : बीआरएसच्या तेलंगणा मॉडेलचं पितळ उघडं; नेतेच करतायत शेतकऱ्यांची दिशाभूल?

कांदा काढणी मे अखेरीस १०० टक्के पूर्ण झाली आहे. यंदा सुमारे ११ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. जळगाव, चाळीसगाव, धुळे येथील बाजार समितीत कांद्याचे लिलाव रखडत सुरू आहेत. पण लिलाव प्रक्रिया मार्गी लागत आहे.

आवक स्थिर आहे. धुळ्यात सध्या प्रतिदिन एक हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. जळगाव येथेही प्रतिदिन ६०० ते ७०० क्विंटल आवक होत आहे. जळगाव येथे आवक स्थिर आहे. पण दरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com