Sugar Production: देशातील साखर उत्पादन १८ टक्क्यांनी घटले

Sugar Crisis: देशातील साखर उत्पादनात यंदाही घट आली आहे. ३० एप्रिलपर्यंत साखर उत्पादन १८ टक्क्यांनी कमी झाले आहे. तर यंदाचे साखर उत्पादन २६१ लाख टनांवरच स्थिरावण्याची शक्यता आहे.
Sugar Production
Sugar Production Agrowon
Published on
Updated on

Pune News: देशातील साखर उत्पादनात यंदाही घट आली आहे. ३० एप्रिलपर्यंत साखर उत्पादन १८ टक्क्यांनी कमी झाले आहे. तर यंदाचे साखर उत्पादन २६१ लाख टनांवरच स्थिरावण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील साखर उत्पादनही २६ टक्यांच्या दरम्यान कमी झाले. आतापर्यंत महाराष्ट्रात ८१ लाख टन साखर उत्पादन झाले, असे एनएफसीएसएफने म्हटले आहे. 

नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीन शुगर फॅक्टरीज् अर्थात एनएफसीएसएफने दिलेल्या माहिती नुसार, देशातील साखर उत्पादन गाळप हंगाम सुरु झाल्यापासून म्हणजेच १ ऑक्टोबर ते ३० एप्रिलपर्यंत २५७ लाख टन झाले. मागील वर्षी याच काळातील साखर उत्पादन ३१५ लाख टन होते. म्हणजेच यंदाच्या साखर उत्पादनात तब्बल १८.३४ टक्क्यांनी घट झाली.

Sugar Production
Sugar Production: साखर उत्पादनात ठरणार उत्तर प्रदेशच अव्वल

गाळप हंगाम सुरु झाल्यापासून सात महिन्यात साखर उत्पादन  जळपास ५८ लाख टनांनी कमी झाले. देशात साखर उत्पादन चालू हंगामात २६१ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज आहे. देशातील सर्व राज्ये आणि साखर कारखाना पातळीवरील अंदाज लक्षात घेतल्यानंतर हा अंदाज देण्यात आला आहे, असे एनएफसीएसएफने स्पष्ट केले. 

Sugar Production
Sugar Quota: मे चा साखरविक्री कोटा घटवला

उत्तर प्रदेशात १२२ साखर कारखान्यांनी उसाचे गाळप केले. त्यापैकी १११ कारखान्यांनी गाळप सुरु केले. उत्तर प्रदेशात ९४८ लाख टन उस गाळप झाले. त्यातून ९२ लाख ५० हजार साखर उत्पादन झाले. तर साखर उतारा ९.७५ टक्क मिळाला. कर्नाटकात ७९ साखर कारखान्यांनी ५०२ लाख टन ऊस गाळप केले. कर्नाटकात ८.०५ टक्के उताऱ्यासह ४० लाख टन साखर उत्पादन झाले. कर्नाटकात यंदा ४२ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. 

तमिळनाडूमध्ये ३० साखर कारखान्यांपैकी २३ कारखान्यांचे पट्टे पडले. या कारखान्यांनी ५७ लाख टन उसाचे गाळप केले. सरासरी साखर उतारा ८.३५ टक्के मिळाला. तर जवळपास ९ लाख टन साखर उत्पादन झाले. तमिळनाडूत यंदा साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. 

महाराष्ट्रात उत्पादन घटले

महाराष्ट्रातील २०० साखर कारखान्यांनी यंदा ऊस गाळप केले. त्यापैकी १९९ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले. केवळ एका कारखान्याचे गाळप सुरु होते. महाराष्ट्रात ८५२ लाख टन उसाचे गाळप झाले. त्यातून ९.५० साखर उताऱ्यासह ८१ लाख टन साखर उत्पादन झाले. मागवर्षी जवळपास ११० लाख टन साखर उत्पादन होते. राज्यातील साखर उत्पादनात २६ टक्क्यांनी घट झाली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com