Sugar Rate : उन्हाळा, सणांमुळे साखरदरात प्रतिक्विंटल १०० रुपयांपर्यंत वाढ

Sugar Market : उन्हाळा आणि सणांमुळे साखरेला वाढलेल्या मागणीमुळे देशातील प्रमुख बाजारपेठांतील साखरेचे दर वाढले आहेत.
Sugar Production
Sugar Productionagrowon

Kolhapur News : उन्हाळा आणि सणांमुळे साखरेला वाढलेल्या मागणीमुळे देशातील प्रमुख बाजारपेठांतील साखरेचे दर वाढले आहेत. ईद व चैत्रनवमीमुळे साखरेला गेल्या पंधवरड्यात मागणी वाढली. याचा सकारात्मक परिणाम साखरेच्या दरवाढीवर झाला. पंधरवड्यात मुख्य बाजारपेठांमध्ये साखरेच्या दरात क्विंटलला शंभर रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ३५०० ते ३५५० रुपये दर आहेत. केंद्र सरकारने कारखान्यांच्या साखर विक्रीवर बंधने लावताना दिलेल्या कोट्याइतकाच साखर विक्री करावी, असे आदेश काढले आहेत. यामुळे कारखान्यांना साखर विक्री करताना विक्री केलेल्या साखरेची नोंदणी वेबसाइटवर करणे बंधनकारक झाले.

गेल्याच महिन्यात याबाबत केंद्र सरकारने प्रत्येक कारखान्याला सक्त सूचना पत्राद्वारे केल्या आहेत. यामुळे कारखाना पातळीवरून सावधगरीने विक्री सुरू आहे. कारखाने मर्यादेपेक्षा जास्त विक्री करत नसल्याने काही बाजारपेठामंध्ये साखरेचे दर वाढत असल्याचे चित्र आहे. शीतपेये, आईस्क्रीमबरोबर मिठाई उद्योगांतूनही एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात साखरेला मागणी कायम राहिली.

Sugar Production
Sugar Factory : ‘पूर्णा सहकारी’ वगळता इतर २८ साखर कारखाने बंद

उन्हाळा सुरू होण्यापूर्वी साखरेचे दर ३४०० ते ३४५० पर्यंत होते. संक्रांतीला थोडीफार दरवाढ झाली होती. त्यानंतर दरात वाढ झाली नाही. साखरेला मागणी कमी असल्याने दरातही विशेष वाढ नव्हती. यातच देशात अनपेक्षितपणे साखरेचे उत्पादन वाढले. यामुळे भविष्यात साखरेची चणचण भासणार नाही, असे वातावरण बाजारपेठेत तयार झाले.

देशपातळीवरील अनेक संस्था व खुद्द साखर उद्योगातूनही यंदा हंगाम समाप्तीनंतर पुढील हंगामापर्यंत साखर पुरेशी शिल्लक राहील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या सगळया अंदाजांच्या पार्श्‍वभूमीवर साखरेला गरजेइतकीच मागणी असल्याचे साखर उद्योगांतून सांगण्यात आले.

Sugar Production
Sugar Season : कर्नाटक, गुजरातचा साखर हंगाम आटोपला

केंद्राने उन्हाळ्यामध्ये मागणी येईल या अपेक्षेने अगोदरच यंदाचा सर्वेोच्च २५ लाख टनांचा साखर कोटा देशातील कारखान्यांना दिला आहे. यामुळे कारखान्यांकडे विक्रीसाठी पुरेशी साखर आहे. परिणामी दर वाढला तरी कारखान्यांना फायदा होणार नाही, असा समज चुकीचा असल्याचे अन्न व सार्वजनिक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

अद्याप उन्हाळ्याची खरेदी पुढील एक महिना तरी नक्कीच होणार आहे. यामुळे पुढील एक महिना तरी साखर विक्री चांगली होईल. यामुळे या महिन्यात कारखान्यांचे कोटे संपू शकतात, असे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

साखरेचे १७ एप्रिलचे राज्यनिहाय दर (रुपयांत)

(जीएसटी वगळून)

प्रकारानुसार प्रतिक्विंटल, किमान ते कमाल (दर रुपयांत)

राज्य एम ३० एस ३०

महाराष्ट्र ३५००-३५५० ३६००-३६५०

कर्नाटक ३७००-३८०० -

उत्तरप्रदेश - ३८७०-३८९०

गुजरात ३५७५-३६१० ३६७५-३७२०

तामिळनाडू ३७७५- ३९५० ३८००-३८८५

मध्यप्रदेश ३६००-३६१० ३६५०-३६६०

पंजाब - ३८२५-३८६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com