Sugar Season : कर्नाटक, गुजरातचा साखर हंगाम आटोपला

Sugar Production : कर्नाटक, गुजरातचा हंगाम पूर्णपणे आटोपला आहे. कर्नाटकात यंदाच्या हंगामात ५० लाख, तर गुजरातमध्ये ९ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
Sugar Export
Sugar ExportAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : कर्नाटक, गुजरातचा हंगाम पूर्णपणे आटोपला आहे. कर्नाटकात यंदाच्या हंगामात ५० लाख, तर गुजरातमध्ये ९ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. यंदा एप्रिलच्या मध्यापर्यंत महाराष्‍ट्र देशात सर्वाधिक १०९ लाख टन साखर तयार करत उत्पादनात अग्रेसर आहे.

त्या खालोखाल १०१ लाख टन साखर निर्मिती करत उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती इंडियन शुगर ॲण्ड बायोएनर्जी मॅन्यूफ्रॅक्चर्स असोसिएशनकडून (इस्मा) मिळाली आहे. गेल्‍या वर्षी कर्नाटकात ५४ लाख टन साखर तयार झाली होती. गुजरातमध्ये गेल्या वर्षी इतकीच साखर तयार झाली आहे. तमिळनाडूत ८ लाख टन साखर निर्मिती झाली. ती गेल्या वर्षीपेक्षा २ लाख टनांनी कमी आहे.

Sugar Export
Sugar Production : देशात ३१८ लाख टन साखर उत्पादनाची शक्यता

देशातील साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ २ लाख टनांनी कमी आहे. एप्रिल मध्‍याअखेर (ता. १५) देशात ३१० लाख टन साखर तयार झाली. गेल्‍या वर्षी याच कालावधीत ३१२ लाख टन साखर निर्मिती झाली होती. यंदा ५३२ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता, त्‍यापैकी ४४८ कारखान्यांचा हंगाम संपला आहे.

८४ कारखाने अद्यापही सुरू आहेत. गेल्या वर्षी (२०२२-२३) ५३३ साखर कारखान्यांनी हंगाम सुरु केला होता. या कालावधीत ४०१ कारखान्यांनी हंगाम संपविला होता. तर १३२ साखर कारखाने सुरु होते. ३१२ लाख टन साखर तयार झाली होती.

गेल्या वर्षी या कालावधीत देखील महाराष्‍ट्राची आघाडी कायम होती. साखर उत्पादन मात्र १०५ लाख टन झाले होते. गेल्या वर्षीपेक्षा महाराष्ट्रात ४ लाख टन साखर अधिकची तयार झाली आहे. उत्तर प्रदेशात ९६ लाख टन साखर निर्मिती झाली होती.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्राचा हंगाम काहीसा उशिरा संपणार आहे. गेल्‍या वर्षी या कालावधीत राज्याचा हंगाम पूर्णपणे संपला होता. आता १५ कारखाने सुरू आहेत. आणखी दहा ते पंधरा दिवसांत राज्याचा हंगाम संपण्याची शक्यता आहे.

Sugar Export
Sugar Production : ‘कादवा’ साखर कारखान्याकडून ४ लाख क्विंटल साखर उत्पादन

उत्तर प्रदेशातील ४२ कारखाने अजूनही सुरू आहेत. यामुळे देशात सर्वात शेवटी उत्तर प्रदेशचा हंगाम संपेल अशी चिन्हे आहेत. शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेश महाराष्र्टातील उत्‍पादनाशी बरोबरी करू शकते. सध्या उन्‍हामुळे उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनाही ऊस तोडणीसाठी झगडावे लागत आहे.

तज्ज्ञांचे अंदाज चुकवत राज्याची भरारी

यंदा सुरवातीच्या टप्प्यात महाराष्ट्र साखर उत्पादनात मागे होता. आंदोलन व पावसामुळे राज्यातील ऊस तोडणी पंधरा दिवस ते महिनाभर रखडली. डिसेंबर नंतर मात्र राज्याने साखर उत्पादनात भरारी घेत अग्रक्रम पटकाविला, तो १५ एप्रिल अखेर कायम आहे. तज्ज्ञ व साखर उद्योगातील संस्थांचे अंदाज चुकवत राज्याने साखर उत्पादनात भरारी मारली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com