कोल्हापूर : भारतापाठोपाठ ब्राझीलमध्ये ही येणाऱ्या वर्षांमध्ये साखरेचे उत्पादन (Sugar Export) वाढणार असल्याने यंदा उच्चांकी साखर उत्पादनाचा अंदाज (Estimated Sugar Production) वर्तविण्यात आला आहे. जगाचे साखर उत्पादन (Global Sugar Production) ऑगस्टपर्यंत २०२३ पर्यंत १८२० लाख तर इतके होणार आहे. पूर्वीच्या अंदाजानुसार १८१० लाख टन इतका अंदाज होता.
यंदाच्या हंगामात साखरेचा खप १७५० लाख टन होईल, अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी जगात १७४० लाख टन साखरेची विक्री झाली होते. हंगाम संपेपर्यंत जगात ६० लाख टन साखर शिल्लक राहण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय साखर संघटना (आयएसओ) ने ताज्या अहवालात वर्तवली आहे. संस्थेने ऑगस्टमध्ये दिलेल्या अहवालात ५० लाख टन साखर शिल्लक असेल असे म्हटले होते. १५ नोव्हेंबरला संस्थेने जारी केलेल्या अहवालामध्ये हा आकडा १० लाख टनाने वाढवून ६० लाख टन करण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये जगात सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या ब्राझीलची मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाल्यामुळे याचा परिणाम जागतिक साखर उत्पादनावरही झाला होता. जागतिक बाजारात ब्राझीलची साखर कमी प्रमाणात आल्याने भारतीय साखरेला गेल्या दोन वर्षात फायदा झाला. गेल्या दोन वर्षात उच्चांकी निर्यात झाली. भारत सरकारने निर्यातीबाबत स्पष्ट केलेले धोरण व आगामी ब्राझीलचा ऊस हंगाम या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशनने हा अंदाज व्यक्त केला आहे.
दरम्यान ब्राझीलमध्येही साखरेच्या वाढीव उत्पादनाचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. तेथील संघटनांनीही यंदाच्या हंगामात ब्राझील साखरेकडे वळेल, असे सांगितले आहे. यंदाही सलग दुसऱ्या वर्षी उच्चांकी साखर उत्पादनाची अपेक्षा आहे. सर्व बाबी लक्षात घेता जागतिक बाजारात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल, अशी शक्यता आहे. भारत व ब्राझीलकडून मोठ्या प्रमाणात साखर आंतरराष्ट्रीय बाजारात येण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली.
साखर साठ्याच्या अनुमानात वाढ
गेल्या हंगामाच्या समाप्तीनंतरच येणाऱ्या हंगामात साखर उत्पादन वाढीची अपेक्षा होती. मात्र ब्राझील सारख्या देशांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने व ब्राझील इथेनॉलकडे वळत असल्याने साखर उत्पादनाचे अंदाज त्यानुसार देण्यात आले होते. मात्र गेल्या दोन महिन्यात तेथील कारखान्यांनी साखरेकडे लक्ष देण्याचे ठरवल्याने आता जागतिक साखर संघटनेने ही वाढ अपेक्षित धरून साखर साठ्याच्या अनुमानात वाढ केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.