Sugar Production : ‘नॅचरल’चे उत्पादित सहा लाख साखर पोत्याचे पूजन

Natural Sugar Factory : नॅचरल शुगरने सेंद्रिय खत निर्मितीमध्ये पाऊल टाकले असून त्याचे उत्पादन कारखाना साइटवर सुरू आहे. सदरचा खत हा सेंद्रिय खत असून तो प्रेसमड व नेपियरग्रास च्या फर्मंटेड ऑरगॅनीक मॅन्युअर पासून तयार करण्यात येतो.
Natural Sugar Factory
Sugar ProductionAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या नॅचरल शुगरच्या चालू गाळप हंगामा मधील उत्पादित ६ लाख ११ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन प्रजासत्ताक दिनाचे औचीत्यसाधुन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांचे हस्ते आणि नॅचरल शुगरचे ज्येष्ठ संचालक ज्ञानेश्वरराव काळदाते यांचे अध्यक्षते खाली विधीवत पूजा करून रविवारी (ता. २६) करण्यात आले.

साखर पोते पूजन प्रसंगी बोलताना श्री. ठोंबरे यांनी कारखान्याचा गळीत हंगाम सुरळीत सुरू असून अंतिम टप्यांत आल्याचे त्यांनी सांगितले. चालु वर्षी उसाला हेक्टरी टनेज अपेक्षीत न मिळाल्याने गाळप उद्दीष्टापेक्षा कमी होईल असा अंदाज आहे. त्यामुळे उर्वरित सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Natural Sugar Factory
Sugar Production : लातूर जिल्ह्यात अद्यापपर्यंत १२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

नॅचरल शुगरने सेंद्रिय खत निर्मितीमध्ये पाऊल टाकले असून त्याचे उत्पादन कारखाना साइटवर सुरू आहे. सदरचा खत हा सेंद्रिय खत असून तो प्रेसमड व नेपियरग्रास च्या फर्मंटेड ऑरगॅनीक मॅन्युअर पासून तयार करण्यात येतो.

सदर सेंद्रिय खतामध्ये ऊस पिकासाठी विविध पोषक घटक मिसळून दाणेदार खत तयार करण्यात येत आहे. सदरचे दाणेदार सेंद्रिय खत हे ‘नॅचरल ऑरगॅनिक फर्टिलायझर या नावाने तयार केलेले आहे.

Natural Sugar Factory
Sugar Production : साताऱ्यात ५५ लाख क्विंटल साखरनिर्मिती

सदरचे खत नॅचरल शुगरचे ऊस उत्पादकांना अत्यंत सवलतीचे दरामध्ये कारखान्याचे ‘नॅचरल बझार’ मधून विक्री करण्यात येत, असल्याचे श्री ठोंबरे यांनी सांगितले. तरी आपले ऊस पिकास ‘एनओएफ’ हे खत देवून ऊस पिकांत लक्षणीय वाढ करावी.

सदर ‘एनओएफ’ या खतामध्ये असलेल्या आपल्या जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढवावे आणि आपले शेत जमिनीच्या मातीची प्रत गुणवत्तापूर्ण बनवावी, असे ही त्यांनी सांगितले. साखर पोते पूजन कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग आवाड यांनी केले आणि प्रवर्तक किशोर डाळे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com