Kolhapur Sangli Drougth Condition : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात दुसऱ्यांदा ओला दुष्काळसदृश परिस्थिती

Kolhapur Sangli Rain Damage : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाने शेतात पाणी साचून राहिले आहे. भुईमूग, सोयाबीन, कडधान्ये, ऊस आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
Kolhapur Sangli Drougth Condition
Kolhapur Sangli Drougth Conditionagrowon
Published on
Updated on

Kharip Season : सध्या खरीप हंगामातील मूग, चवळी, उडीद तसेच काही ठिकाणी भुईमूग आदींची काढणी सुरू आहे; परंतु मागील चार दिवसांपासून पुन्हा पावसाने शेतकऱ्यांची दमछाक वाढवली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निसर्गाने दुसऱ्यांदा ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण केली आहे. दिवसभर आभाळ पावसाचे वातावरण व सायंकाळी मुसळधार पाऊस यामुळे हातातोंडाला आलेला खरीप हंगाम हातातून जाण्याची वेळ शेतकऱ्यांच्यावर आली आहे.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाने शेतात पाणी साचून राहिले आहे. भुईमूग, सोयाबीन, कडधान्ये, ऊस आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होत आहे. आडसाली लागण केलेल्या उसात सरी भरून पाणी राहत असल्याने ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. काढावयास आलेल्या व पुढे गेलेल्या उभ्या पिकांना कोंब यायला सुरुवात झाली असल्याने शेतकरी उभ्या पावसात पिकाची काढणी करत आहे. पावसाच्या उघडिपीची नितांत गरच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

तालुक्यात तीन दिवस मुसळधार पाऊस पडला पावसाचा जोर कमी होत चालला असला, तरी अधूनमधून पाऊस अजूनही सुरूच असल्याने दुसऱ्यांदा ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण व्हायला लागल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. तालुक्यात चालू वर्षी जुलै महिन्‍यातच सरासरी एवढा पाऊस पडला असला, तरी सलग व मुसळधार पडलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील कोवळी पिके पाण्याखाली गेल्यामुळे व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी जोमात आलेल्या ऊस पिकांचे नुकसान झाले होते.

शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातून सावरून उरली सुरली पिके पदरात पाडून घेण्यासाठी धडपडत असला, तरी पावसाचा मोठा व्यत्यय येत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असला, तरी चालू वर्षीही बळीराजाला नुकसानीचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पाऊस व वादळी

वाऱ्यामुळे ऊस पिके व भाजीपाला बागा उन्मळून पडायला लागली आहेत. पावसाचा जोर कमी होत असला, तरी याचा परिणाम काढणी मळणीवर होताना दिसत नाही. शेतकऱ्यांनी उघडिपीच्या काळात काढलेली पिके अजूनही वाळवलेली नाहीत, भाताचे पिंजर शेतातच कुजायला लागले आहे. त्यामुळे शेतकरी पिके काढावयास धजवत नसल्याचे चित्र आहे.

दिवसेंदिवस अडचणीत वाढ होत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. दुसरीकडे शेतात जादा पाणी झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांना कोंब यायला लागल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

शेतकऱ्यांना तारेवरची कसरत

शेतात पाणी साचून राहिल्यामुळे सोयाबीन, भुईमूग व कडधान्ये पिके कुजायला लागली आहेत. परिणामी हातातोंडाला आलेल्या पिकांचे नुकसान व्हायला सुरुवात झाली आहे. हातातोंडाला आलेली कडधान्ये भुईमूग व सोयाबीन पिकासाठी धोकादायक ठरायला लागला आहे. शेतातील पाणी काढावयासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून परिणामी घातलेला खर्च वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com