Sugar Rate: साखर दर ३८०० रुपयांवर; ‘एमएसपी’पेक्षा ७०० रुपयांनी अधिक भाव

Sugar Market: देशांतर्गत बाजारात साखरेचे दर सध्या ३८०० रुपये क्विंटलपर्यंत स्थिर आहेत. कमी उत्पादन आणि वाढत्या मागणीमुळे दरातील घसरणीची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. उन्हाळ्यात शीतपेय आणि आइस्क्रीम उद्योगाकडून वाढणारी मागणी दर वाढवू शकते.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News: देशांतर्गत बाजारात सध्या साखरेचे दर स्‍थिर आहेत. गेल्‍या महिन्यापासून साखरेचे दर सरासरी ३८०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. एमएसपीपेक्षा (किमान विक्री दर) साखरेच्या दरात सुमारे ७०० रुपयांची वाढ झाली आहे. कमी साखर उत्पादन व उन्हाळ्‍यात मागणी वाढण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत साखरेचे दर याच प्रमाणात स्थिर राहू शकतील, असा अंदाज साखर उद्योगाचा आहे.

Sugar Production
Maharashtra Sugar Rate : राज्यातील ९६ साखर कारखान्यानी एफआरपी थकवली; साखर आयुक्त विभागाकडून कारवाई होणार का?

यंदा देशात साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर साखरेला गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली मागणी राहील असा अंदाज साखर उद्योगाचा आहे. गेल्‍या काही दिवसांपासून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्‍हाचा तडाखा वाढत असल्याने येत्या काही दिवसांत शीतपेय व आइस्क्रीम उद्योगातून साखरेला मागणी वाढेल अशी स्थिती आहे. सध्या जरी अपेक्षित मागणी नसली तरी दर मात्र दोन महिन्यांच्या तुलनेत १०० ते २०० रुपयांनी वाढले आहेत.

जानेवारीच्या दरम्‍यान ३५५० ते ३६५० रुपयापर्यंत दर होते. आता ३८०० रुपयांपर्यंत दराचा आलेख पोहोचला आहे. देशाबरोबर राज्यातील साखर हंगामही झपाट्याने अंतिम टप्प्यात येत आहे. कमी उसामुळे अनेक कारखाने उद्दिष्टपूर्तीसाठी धडपडत आहेत, यामुळे साखर निर्मितीलाही मर्यादा आल्या आहेत. यामुळे हंगामअखेर जेमतेम साखर शिल्लक राहील, असा अंदाज असल्याने साखर दरात मोठ्या घसरणीची शक्यता कमी असल्‍याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

Sugar Production
Sugar Factory: गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट वेगाने साखर कारखाने बंद

उत्तर प्रदेशातील अनेक बाजारामध्ये एक्स मिल साखरेच्या किमती ४००० रुपये किंवा त्याही पेक्षा जास्त आहेत. महाराष्ट्रात ३८०० रुपयांपर्यंत दर आहेत. सध्या साखर बाजारात एकदम मागणी नसल्याने दरातील चढ-उतार क्‍विंटलला १० ते २० रुपये इतक्याच प्रमाणात आहे.

दरस्थिती पाहूनच एमएसपी वाढीचा निर्णय

सध्या एमएसपीपेक्षा चांगले दर असल्याने केंद्रानेही साखरेची एमएसपी वाढीच्या निर्णयाबाबत अद्याप साखर उद्योगाला अंदाज दिला नाही. ही बाब केंद्राच्या विचाराधीन असली तरी बाजारातील दराची परिस्थितीत पाहूनच याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी स्पष्‍टोक्ती केंद्रीय स्तरावरून देण्यात आली होती. एमएसपीपेक्षा सध्या दर चांगले असल्याने स्थानिक बाजारातील स्थिती पाहूनच एमएसपी वाढीबाबत निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com