America Canada Trade War: ट्रम्प यांची खेळी अमेरिकेच्याच शेतकरी, ग्राहकांच्या अंगलट; आयाशुल्क वाढीमुळे भाव वाढले, निर्यातीवरही परिणाम

Trump Trade Policy: अमेरिकेने कॅनडाच्या आयातीवर २५ टक्के शुल्क लागू केल्यानंतर अमेरिकेत तेल, भाजीपाला, फळांसह काही मालाचे भाव वाढले आहेत. तसेच कॅनडातून ८० टक्के पोटॅश येत असल्याने खत दरवाढीचाही शाॅक शेतकऱ्यांना बसला आहे.
America Canada Trade War
America Canada Trade WarAgrowon
Published on
Updated on

Pune News: अमेरिकेने कॅनडाच्या आयातीवर २५ टक्के शुल्क लागू केल्यानंतर अमेरिकेत तेल, भाजीपाला, फळांसह काही मालाचे भाव वाढले आहेत. तसेच कॅनडातून ८० टक्के पोटॅश येत असल्याने खत दरवाढीचाही शाॅक शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच कॅनडानेही प्रतिक्रिया देत आयात शुल्क वाढीचा निर्णय घेतल्याने अमेरिकेच्या काही शेतीमालाचे भावही कमी झाले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांची खेळी अमेरिकेच्या शेतकरी आणि ग्राहकांच्या अंगलट येत असल्याचे दिसत आहे.

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ फेब्रुवारीपासून कॅनडा आणि मेक्सिकोमधून आयात होणाऱ्या वस्तुंवर २५ टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याची घोषणा केली. त्यानंतर लगेच याला ३० दिवसांची स्थिगिती देत दोन्ही देशांना अटी मान्य करण्यास सांगितले. मात्र जागतिक बाजारात व्यापार युध्दाची सुरुवात झाल्याची चर्चा सुर झाली.

America Canada Trade War
Agrowon Podcast: आल्याच्या भावात मोठी घसरण; हळद, केळी, कापूस तसेच काय आहे सोयाबीन भाव?

त्यातही अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांमधील व्यापार युध्दाचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले. हे पडसाद केवळ या दोन देशांच्याच बाजारावर पडले नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारावर याचे पडसाद दिसले. कारण हे दोन्ही देश एकमेकांच्या आयात निर्यातीवर तर अवलंबून आहेच. शिवाय जगातील अनेक दशांचे अमेरिका आणि कॅनडासोबत आयात निर्यातीचे संबंध आहेत.

कॅनडाच्या शेतीमाल आणि इतर वस्तुंवर आयात शुल्क लावल्यानंतर कॅनडाने अमेरिकेच्या शेतीमाल आणि वस्तुंवर आयात शुल्क जाहीर केले. याचा फटका अमेरिकेलाही बसत आहे. कारण अमेरिका कॅनडातून पोटॅशची मोठ्या प्रमाणात आयात करत असतो. अमेरिका ८० टक्के पोटॅशची आयात कॅनडातून करतो. पण आयात शुल्क वाढवल्याने खतांचे भाव वाढले. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अमेरिकेतील शेतकऱ्यांना हिवाळी पिकांची लागवड करायची आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मानगुटीवर खत दरवाढीची भीती कायम आहे.

America Canada Trade War
Pulses Mission: कडधान्य मिशनचा पंजाबला होणार फायदा; तूर, उडीद, मसूर हमीभावाने खरेदी

याशिवाय अमेरिका कॅनडाला सोयाबीन, सोयापेंड, पोल्ट्री, डेअरी, शेती अवजारांची निर्यात करत असतो. पण कॅनडानेही आयात शुल्काची घोषणा केल्याने निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. १ फेब्रुवारीनंतर या शेतीमालाच्या किमतींमध्ये मोठी घट झाली होती. सोयाबीन आणि सोयापेंड, तसेच कापसाचे भाव पडले होते. ३ जानेवारीला स्थिगिती दिल्यानंतर बाजार पुन्हा सावला होता. थोडक्यात अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या शेतीमालाच्या भावावरही ट्रम्प यांच्या शुल्क वाढीचा परिणाम कॅनडाची प्रतिक्रिया म्हणून दिसून आला.

कॅनडातून अमेरिकेला फळे, भाजीपाला, मांस, डेअरी, कॅनोला तेल आणि इतर खाद्य पदार्थांची निर्यात होत असते. अमेरिका यासाठी कॅनडावर काही प्रमाणात अवलंबून आहे. पण अमेरिकेनेच आयात शुल्क वाढवल्याने या मालाच्या किमती वाढल्या आहेत. याचा फटका अमेरिकेतील ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे अमेरिकेने कॅनडावर २५ टक्के आय़ातशुल्क लावले नाहीतर आपल्याच ग्राहकांवर २५ टक्के शुल्क लावले आहे, असे अमेरिकेतील लोक बोलून दाखवत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com