
Akola News : सोयाबीन खरेदीला एकीकडे वेग आलेला असतानाच अकोला जिल्ह्यात खरेदीचे उद्दिष्ट आटोपल्याने पुन्हा ही प्रक्रिया थांबली आहे. जिल्ह्यात याच महिन्यांत सुमारे १ लाख ९२ हजार क्विंटलचे वाढीव उद्दिष्ट मिळाले होते. तेही पूर्ण झाले.
अकोला जिल्ह्यात या वर्षात हमीभावाने खरेदी सुरू असलेल्या केंद्राकडे सोयाबीन उत्पादकांचा कल आहे. बाजारात भाव नसल्याने शेतकऱ्यांची या केंद्रावर माल विक्रीसाठी चढाओढ सुरू आहे. जिल्ह्याला पहिल्या टप्यात सुमारे साडेचार लाख क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट होते.
१२ जानेवारीला हे उद्दिष्ट एक लाख ९२ हजार क्विंटलने वाढवून देण्यात आले. तेही गुरुवारी (ता. २३) आटोपल्याने सोयाबीन खरेदी ठप्प झाली आहे. जिल्ह्यात अद्याप हजारो शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करणे बाकी आहे. यंदाच्या मोसमातील सोयाबीन खरेदीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत आहे. अशातच आठवडाभरापूर्वीच जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी उद्दिष्ट आटोपल्याने बंद झाली आहे.
उद्दिष्ट वाढीचा प्रस्ताव
जिल्ह्यात या हंगामात सुमारे सहा लाख ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीन खरेदी झालेली आहे. नोंदणी केलेल्यांपैकी अनेकांचा माल मोजणे शिल्लक असल्याने या शेतकऱ्यांसाठी खरेदी उद्दिष्ट वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे नव्याने प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. काही जिल्ह्यांमध्ये उद्दिष्ट शिल्लक असल्याने ते इकडे वाढवून देण्याची मागणी होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.