Nashik News : जिल्ह्यात राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सोयाबीनची हमीभावाने खरेदी प्रक्रिया १५ ऑक्टोबरपासून सुरू झाली. मात्र नोंदणी केलेल्या संख्येच्या तुलनेत ही खरेदी अत्यल्प आहे.
एकूण सात खरेदी केंद्रे असून ३ केंद्रांवर खरेदी झालेली नाही. खरेदी प्रक्रियेत अनेक त्रुटी तर निर्माण झालेल्या गोंधळामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी पूर्ण होईल की नाही असा सवाल उपस्थित होत आहे.
पहिल्या टप्प्यात नोंदणीची मुदत १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबरपर्यंत होती. मात्र त्यात अनेक त्रुटी असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करताना अडचणी आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुसऱ्या टप्प्यात मुदतवाढ मिळाल्यानंतर ६ जानेवारपर्यंत नोंदणी केली. ही शेतकरी नोंदणी संख्या ४,२७५ झाली.
मात्र मंगळवारअखेर (ता. ७) अवघ्या ६२३ शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात देवळा, येवला, चांदवड, मालेगाव, सिन्नर, लासलगाव व विंचूर येथे सात केंद्रे सुरू करण्यात आली. मात्र त्यापैकी देवळा, मालेगाव व विंचूर येथे खरेदी शून्यावर आहे. कामकाज व खरेदी प्रक्रियेत अडथळे असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात ४,२७५ शेतकऱ्यांनी नोंदणी असताना खरेदीसाठी फक्त १,९३२ शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे संदेश पाठवण्यात आला आहे. तर २,३४३ शेतकऱ्यांना अद्याप खरेदीसाठी संदेश पाठवण्यात आलेला नाही. ६२३ शेतकऱ्यांकडून ८,२१४ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. त्यांपैकी वखार महामंडळाकडे ५,२८० क्विंटल सोयाबीन जमा करण्यात आली आहे.
तर काही खरेदी केंद्रांवर निकषाप्रमाणे खरेदी न झाल्याने सोयाबीन वखार महामंडळाकडे जमा करण्यात आलेली नाही. त्यामध्ये गुणवत्तेचा भाव व निकष डावलून झालेली खरेदी असे कारण असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नोंदणी झाली खरी; मात्र शेतकऱ्यांची अखेरच्या टप्प्यापर्यंत सोयाबीन खरेदी पूर्ण होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
एकीकडे केंद्रांची स्थापना झाली, मात्र खरेदीची कुठलीही सकारात्मक परिस्थिती नसल्याने काही केंद्रांवर बोजवारा उठल्याचे चित्र आहे. या निमित्ताने समोर आहे यापूर्वी शेतकरी नोंदणीसाठी अगोदर ऑनलाइन पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी आल्या. तर मुदतवाढ दिल्यानंतर नोंदणी वाढूनही शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे खरेदी पूर्ण होईल की नाही हाही मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
खरेदी केंद्रे नोंदणीकृत शेतकरी संख्या झालेली खरेदी
(क्विंटल) खरेदी झालेली शेतकरी संख्या
देवळा खरेदी विक्री संघ १९ ० ०
येवला खरेदी विक्री संघ ९१० ४,२०३.५० ३२८
मालेगांव खरेदी विक्री संघ ० ० ०
चांदवड खरेदी विक्री संघ ६२१ ३३७ ३१
सिन्नर खरेदी विक्री संघ १६४८ ८८८ ६८
लासलगाव खरेदी विक्री संघ ६६९ २,७८५.५० १९६
विंचूर कृषिसाधना खरेदी विक्री संघ ३९८ ० ०
(संदर्भ : जिल्हा पणन अधिकारी कार्यालय, नाशिक)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.