
Pune News : देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात पुन्हा १०० ते २०० रुपयांपयांपर्यंत नरमाई आली आहे. सोयाबीनचा भाव मागील ३ दिवसांमध्ये सध्या ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर सोयाबीनची खरेदी खुपच धिम्या गतीने सुरु आहे. आतापर्यंत राज्यात केवळ सव्वा लाख टनांची खरेदी झाली.
सोयाबीनचा भाव चालू हंगामात सुरुवातीपासूनच कमी आहे. शेतकऱ्यांना बाजारात साधा हमीभावही मिळत नाही. मागच्या आठवड्या पर्यंत बाजारात सोयाबीनला सरासरी ४ हजार ते ४ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत होता. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव सरासरी ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. पण मागील ३ दिवसांपासून सोयाबीनच्या भावावर आणखी दबाव वाढत गेला. सोयाबीनचे भाव क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांनी कमी झाले. सध्या सोयाबीन ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयाने विकले जात आहे.
सरकारने यंदा सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र सध्या शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा किमान ८०० ते १ हजार रुपये कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधीच मागील २ वर्षांपासून सर्व महागाई वाढली. मात्र सोयाबीनचे भाव वर्षाला कमी होत आहेत. सध्या देशातील बाजारात मिळणारा भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
बाजारात सोयाबीनचे कमी झाल्यानंतर सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदीला मान्यता दिली. देशभरात ३३ लाख ६० हजार टन सोयाबीन खरेदी जाणार आहे. तर महाराष्ट्रात १४ लाख टनांची खरेदी होणार आहे. आधी १३ लाख टनांची परवानगी देण्यात आली होती. मात्र नंतर पुन्हा एक लाख टनांनी उद्दीष्ट वाढविण्यात आले. खरेदीचे उद्दीष्ट वाढवले मात्र खरेदी नगण्य झाली. सरकारने पहिल्या टप्प्यात १० लाख टन खरेदीचे उद्दीष्ट ठेवले आहे. आतापर्यंत सव्वालाख टनांची खरेदी झाल्याची माहिती पणन विभागाने दिली. म्हणजेच उद्दीष्टाच्या केवळ १२.२५ टक्के खरेदी झाली.
हमीभावाने खरेदी १२ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. म्हणजेच आणखी एक महिना. खरेदी सुरु होऊन २ महिने झाले. या दोन महिन्यांमध्ये केवळ १२.२५ टक्के सोयाबीनची खरेदी झाली. मग उरलेल्या एक महिन्यात उद्दीष्ट पूर्ण होणार का? हा प्रश्न आहे. त्यामुळे सोयाबीनची खरेदी शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी एख स्टंटबाजी आहे, असा आरोपही शेतकरी करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.