
Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यात किंमत आधार योजना २०२४-२५ अंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) बुधवार (ता. ४) एकूण १६ केंद्रांवर २ हजार ९३९ शेतकऱ्यांचे ५४ हजार ५८७ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे.
या सोयाबीनची किंमत २६ लाख ७० लाख ४२ हजार रुपयावर होते. त्यापैकी १५ केंद्रावरील ९७९ शेतकऱ्यांना १५ हजार २४७ क्विंटल सोयाबीनचे ७ कोटी ४५ लाख ८८ हजार ३२४ रुपये चुकारे अदा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.
परभणी जिल्ह्यात नाफेड अंतर्गतच्या १२ खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी १० हजार ६६८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. बुधवार (ता. ४) पर्यंत २१ हजार ३९१ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.
या सोयाबीनची किंमत १० कोटी ४६ लाख ४६ हजार ६६५ रुपये होते. त्यापैकी परभणी, पेडगाव, बोरी, सेलू, पूर्णा या ५ केंद्रांवर सोयाबीन विक्री केलेल्यांपैकी ४३४ शेतकऱ्यांना ६ हजार ५५३ क्विंटल सोयाबीनचे ३ कोटी २० लाख ५७ हजार २६६ रुपये चुकारे अदा करण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात एनसीसीएफ अंतर्गतच्या १५ खरेदी केंद्रांवर बुधवार (ता. ४) पर्यंत सर्व १५ केंद्रावर मिळून एकूण १ हजार ७३९ शेतकऱ्यांचे ३३ हजार १९६ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.
या सोयाबीनची किंमत १६ कोटी रुपये होते. त्यापैकी हिंगोली, कनेरगाव, फाळेगाव, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, येळेगाव, सेनगाव, नागासिनगी या १० केंद्रावर सोयाबीन विकलेल्या ५४५ शेतकऱ्यांना ८ हजार ६९३.९९ क्विंटल सोयाबीनचे ४ कोटी २५ लाख रुपये चुकारे अदा करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.