Soybean Oil Import : सोयाबीन तेल आयात आठ टक्क्यांनी वाढली

मागील चार महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर कमी झाले. त्यामुळं देशात खाद्यतेलाची आयात वाढली.
Soybean oil import
Soybean oil importagrowon

देशातील शेतकऱ्यांना चांगला दर न देता स्वस्त आयातीचा अट्टाहास किती अंगलट येऊ शकतो याचा अनुभव मागील वर्षभरात भारताला आलाच आहे. आता सोयाबीनचा हंगाम (Soybean Season) अगदी तोंडावर आला आहे. पण यंदाही मागील दहा महिन्यांत खाद्यतेल आयातीत (Edible Oil Import India) ६ टक्क्यांनी मोठी वाढ झीली आहे. त्यातही सोयाबीन तेल आयातीचं (Soybean Oil Import) प्रमाण ८ टक्क्यांनी वाढलं आहे, अशी माहिती साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (Solvent Extractors Association of India) आर्थात एसईएनं दिली.

Soybean oil import
SIILC : बना कमर्शिअल डेअरी फार्म सुपरवायझर

मागील चार महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर कमी झाले. त्यामुळं देशात खाद्यतेलाची आयात वाढली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कच्च्या पामतेलाचे आयातीचे दर हे प्रतिटन १९३५ डाॅलरवर होते. मात्र त्यानंतर दरात घट होत गेली. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हाच दर ९८५ डाॅलरने कमी होऊन ९५० डाॅलरपर्यंत घसरले, एसईएनं दिली. तसंच कच्च्या सोयाबीन तेलाच्या दरतही ६०७ डाॅलरने घट होऊन १३३५ डाॅलर प्रतिटनापर्यंत स्थिरावले. कच्चे सूर्यफुल तेलही ७३० डाॅलरने कमी झाले. भारतात आधीच खाद्यतेलाची टंचाई जाणवत होती. त्यातच दर कमी झाल्यानं आयात वाढली.

Soybean oil import
E- Pik Pahani - ई-पीक पाहणीमध्ये गोंधळ सुरूच ? | ॲग्रोवन | ॲग्रोवन

भारताचं तेल विपणन वर्ष नोव्हेंबरपासून सुरु होतं. यंदा नोव्हेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ या १० महिन्यांत खाद्यतेल आयात गेल्यावर्षीपेक्षा ६ टक्क्यांनी वाढ झाली, असं एसईएनं म्हटलंय. ऑगस्ट महिन्याचा विचार करता आयात ३३ टक्क्यांनी जास्त झाली. जुलै महिन्यातही आयातीचं प्रमाण २४ टक्क्यांनी वाढलेलं होतं.

Soybean oil import
Banana Disease : केळी बागांमध्ये ‘कुकुंबर मोझॅक’ रोगाचे थैमान

मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी होत असताना सुरुवातीच्या तीन महिन्यांत आयात कमीच होत गेली. दर आणकी कमी झाल्यास तोटा होऊ शकतो, ही शक्यता गृहित धरून रिफायनरी आणि व्यावसायिकांनी आयात कमी केल्याचं जाणकारांनी सागितलं. मात्र दर गेल्या दोन महिन्यांपासून निचांकी पातळीवर स्थिरावले आहेत. त्यामुळं आयात वाढलीये.

खाद्यतेल आयात पोचली ११४ लाख टनांवर.

मागील दहा महिन्यांत देशात जवळपास ११४ लाख टन खाद्यतेल आयात झालं. यात पामतेलाचं प्रमाण काहीसं घटलंय. मागील वर्षात एकूण तेल आयातीत पामतेलाचं प्रमाण ६१ टक्के होतं. ते यंदा ५३ टक्क्यांवर आलंय. तर सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचं प्रमाण ३९ टक्क्यांवरून ४७ टक्क्यांवर पोचल्याचं एसईएनं म्हटलंय. यंदा पहिल्या दहा महिन्यांमध्ये पामतेलाची जवळपास ५९ लाख टन आयात झाली. तर सोयाबीन तेलाची ३६ लाख टन आणि सूर्यफूल तेलाची १६ लाख टन आयात झाली.

अशी झाली सोयातेल आयात

भारतात पामतेलाची प्रामुख्यानं इंडोनेशिया आणि मलेशियातून आयात होत असते. त्यातही मलेशियातून आयात होणाऱ्या तेलाचं प्रमाण अधिक होतं. तर सोयाबीन तेलाची आयात मुख्यतः अर्जेंटीना, ब्राझील आणि अमेरिकेतून होत असतं. भारतानं या दहा महिन्यांत अर्जेंटीनातून २२ लाख टन, ब्राझीलमधून १० लाख टन आणि अमेरिकेतून दीड लाख टन सोयाबीन तेलाची आयात केली. सूर्यफूल तेलाची आयात युक्रेन, रशिया आणि अर्जेंटीनातून होत असते. यंदा युक्रेनमधून ८ लाख ४२ हजार टन सूर्यफुल तेल आयात झाली, असंही एसईएनं म्हटलंय.

आयातशुल्क वाढविण्याची गरज

भारत सरकारने खाद्यतेल आयातीवर शुल्क कमी केलेलं आहे. तसंच यंदा २० लाख टन सोयाबीन आणि सूर्यफूल तेल आयातीवर कोणतेही शुल्क न लावण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यामुळं यंदा सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात वाढली. मात्र आता देशातील सोयाबीन हंगाम अगदी तोंडावर आलाय. काही बाजारांमध्ये नव्या सोयाबीनची आवक सुरुही झालीये. पण सध्या सोयाबीन दर गेल्यावर्षीच्या तुलनेत २५ ते ३० टक्क्यांनी नरमले आहेत. शुल्करहीत खाद्यतेल आयातीचाही दबाव सध्या दरावर पडतोय. मात्र आयात शुल्कात वाढ केल्यास दर काहीसे सुधारू शकतात. त्यामुळं सोयाबीन तेल आयातीवरील शुल्क वाढवावं अशी मागणी होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com