Sugar Market : जुलैच्या साखर विक्रीसाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ

Sugar Rate : ऑगस्टसाठी २३.५० लाख टनांचा कोटा
Sugar Market
Sugar MarketAgrowon

राजकुमार चौगुले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Sugar Sale : कोल्हापूर केंद्राने ऑगस्ट महिन्यात स्थानिक विक्रीसाठी २३.५० लाख टनांचा साखर कोटा मंजूर केला आहे. ज्‍या साखर कारखान्यांची जुलैची विक्री झालेली नाही, त्यांना ती साखर विक्री करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे गेल्‍या पंधरा दिवसांत पावसाळी हवामानामुळे ज्या कारखान्यांची साखर विक्री झाली नाही, त्‍यांना दिलासा मिळाला आहे.

दबाव नसल्याने कारखाने साखर विक्री निवांतपणे करू शकतील, असा अंदाज आहे. केंद्राने गेल्या ऑगस्टच्या तुलनेत दीड लाख टनाने जादा साखर कोटा मंजूर केला आहे.

गेल्‍या दोन महिन्यांमध्ये साखर विक्रीत संमिश्र स्थिती राहिली. मे मध्ये फारशी दर वाढ झाली नाही. जूनमध्ये मात्र दरात क्विंटलला २०० रुपयांची वाढ मिळाली. पाऊस सुरु होण्यापर्यंत साखरेची विक्री चांगली होत होती. येत्या महिन्‍याच्या कालावधीत अनेक सण असल्याने साखरेला नियमित मागणी होती. जुलैच्या उत्तरार्धात पाऊस सुरु झाला तशी मागणी काहीशी कमी झाली. खरेदी-विक्रीचे व्यवहारही मंदावले. पण अपवाद वगळता दर मात्र स्‍थिर आहेत.

जुलैच्या पहिल्‍या आठवड्यात केंद्राने तातडीने प्रत्येक साखर कारखान्याने विक्री केलेल्‍या साखरेची माहिती ऑनलाइन मागविली होती. देशात साखरेच्या विक्रीची नेमकी काय स्थिती आहे, हे पाहण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलले होते. जे कारखाने ही माहिती देणार नाहीत, त्‍यांना ऑगस्टचा कोटा मिळणार नाही, असेही सांगितले होते. या माहितीचे संकलन केल्यानंतर केंद्राने कोटा वाढविण्‍याबरोबरच जुलैच्या साखर विक्रीला मुदतवाढ देणार असल्‍याचे जाहीर केले.

Sugar Market
Sugar : जुलैची देशांतर्गत साखर विक्रीस एक महिन्याची मुदतवाढ

विशेष म्हणजे तब्बल चार दिवस अगोदरच केंद्राने कोटा जाहीर करून कारखान्‍यांना विक्री करण्‍याबाबत मोकळीक दिली आहे. जागतिक बाजारात साखरेची टंचाई होण्‍याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही किरकोळ बाजारात साखरेच्या किमती वाढतील, अशा शक्‍यतेने केंद्राने नेमकी माहिती घेतली. पुढील हंगामाचा कालावधी व देशातील शिल्लक साखर, सणासुदीचे दिवस हे गृहीत धरुन हा कोटा दिल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

दरस्थिती (२८ जुलै) किमान- कमाल (प्रतिक्‍विंटल) रुपये
राज्‍य...एस ३०...एम ३०
महाराष्‍ट्र...३४६०-३५००...३५६०-३६००
कर्नाटक...३५३० ते ३६००...----
उत्तरप्रदेश...----३६००- ३७००
गुजरात...३५५१-३५५१...३६३१-३६५१
तमिळनाडू...३५६०-३७००...३६७०-३७५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com