Soybean MSP : सोयाबीनचे भाव पोहोचले हमीभावाच्या जवळ

Soybean Market : हंगामात पहिल्यांदाच मिळालेला हा सर्वाधिक दर आहे. हे दर सोयाबीनच्या हमीभावाच्या ४९९२ रुपयांच्या जवळपास गेले आहेत. या अगोदर एप्रिलमध्ये अशीच दराने उसळी घेतली होती.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

Latur News : येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात सोयाबीन दर ४८९० रुपयांपर्यंत शुक्रवारी (ता. ८) गेले. आवकेत घट झाल्यामुळे सोयाबीन दरात मागील दहा दिवसांपासून भाव वाढायला सुरुवात झाली आहे.

हंगामात पहिल्यांदाच मिळालेला हा सर्वाधिक दर आहे. हे दर सोयाबीनच्या हमीभावाच्या ४९९२ रुपयांच्या जवळपास गेले आहेत. या अगोदर एप्रिलमध्ये अशीच दराने उसळी घेतली होती. त्यानंतर तीन महिन्यांनी दर वधारले आहेत. खासगी शेतकरी कंपन्यांकडेही हे भाव ४९०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेले आहेत.

Soybean
Soybean Rate : माजलगाव बाजार समितीत सोयाबीनला सरासरी ४३०० ते ४५०१ रुपयांचा दर

दरवाढीच्या आशेमुळे अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या घरी मागील हंगामातील सोयाबीन साठवून ठेवलेले आहे. खरिपात सोयाबीन फुलोऱ्यात आल्यानंतर भाव वाढत आहेत. २८ जुलै रोजी एक हजार ७५५ क्विंटल आवक झाल्यानंतर भाववाढीला सुरुवात झाली. त्यापूर्वीही आवक कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर दर ४४४८ पासून ४५७५ रुपयांपर्यंत वाढले.

२८ जुलैनंतर दिवसागणिक भावाची चढ-उतार सुरू राहिली. ३० जुलैला चार हजार ६५० रुपये असलेला भाव ७ ऑगस्ट रोजी चार हजार ८९० रुपयांपर्यंत वाढला. गेल्या वर्षीच्या हंगामात सोयाबीन काढणीनंतर पहिल्यांदाच भावाने उसळी घेतली. हा भाव दुसऱ्याच दिवशी ८ ऑगस्ट रोजी ४८४५ रुपयांपर्यंत घसरला.

Soybean
Soybean Market : सोयाबीन खरेदीचे नियोजन हंगामापूर्वीच करा

शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने घरी साठवून ठेवलेले सोयाबीन संपेपर्यंत भाववाढ कायम किंवा स्थिर राहिली, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. दुसरीकडे खासगी शेतकरी कंपन्यांनीही सोयाबीनच्या भावात वाढ केली असून शेतकरी अॅग्रो कंपनीचा शनिवारचा कमाल भाव ४९०० रुपये क्विंटल होता.

भावाच्या चढ-उतारामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी भाव वाढण्याच्या आशा बळावल्या असून ते त्यांनी भाववाढीची चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, भाव वाढीची प्रतीक्षा करावी की सध्या आहे त्या भावाचा लाभ घ्यावा, याची विवंचना शेतकऱ्यांमध्ये कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com