Maize Seeds Rate : रब्बीसाठी मका बियाण्याचे दर यंदा कंपन्यांनी वाढविले

Maize Seeds Rate Increase : रब्बी हंगामात मक्याची लागवड जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर होत असते. यंदा सर्वच बियाणे उत्पादक कंपन्यांनी दरांमध्ये बरीच वाढ केल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला झळ सहन करावी लागते आहे.
Maize Seeds
Maize SeedsAgrowon
Published on
Updated on

Buldana News : रब्बी हंगामात मक्याची लागवड जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर होत असते. यंदा सर्वच बियाणे उत्पादक कंपन्यांनी दरांमध्ये बरीच वाढ केल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला झळ सहन करावी लागते आहे. ३ किलो ६०० ग्राम वजनाच्या एका पाकिटाची किंमत विविध कंपन्यांनी २०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत वाढवली आहे.

रब्बी हंगामातील मक्याच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात या हंगामात सुमारे १० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र राहत असते. रब्बीतील हे क्षेत्र पाहून विविध बियाणे कंपन्यांनी बाजारपेठेत यंदा मक्याच्या पाकिटांचा पुरवठा केला आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत मक्याच्या पाकिटांचा दर २०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. काही नामांकित कंपन्यांनी त्यांच्या वाणाला मागणी पाहून ५०० रुपयांपर्यंत वाढ केल्याचे विक्रेते सांगत आहेत.

Maize Seeds
Maize Market: मक्याच्या भावात काहीशी नरमाई

गेल्या हंगामात ३ किलो ६०० ग्राम वजनाचे जे पाकिट १४०० रुपयांना मिळायचे ते यंदा १७०० रुपयांना विकले जात आहे. तर ८०० ते ८५० दरम्यान विकणारे बियाणे यंदा १२०० ते १३०० पर्यंत नेऊन ठेवण्यात आले. ११५० ते १२०० रुपये किमतीचे पाकिट यावर्षी थेट १६०० रुपयांना शेतकऱ्यांना घ्यावे लागते आहे. एका नामांकित कंपनीचे बियाणे गेल्या वेळी दीड हजारापर्यंत होते. यंदा कंपनीने घसघशीत अशी चारशे रुपयांची वाढ करीत १९०० रुपये किंमत ठेवली आहे.

Maize Seeds
Maize Rate: मक्याचे भाव पडल्याने शेतकरी नाराज

रब्बी मक्याची लागवड साधारणतः डिसेंबरपर्यंत चालते. जसजसे शेत खाली होतात, तसे शेतकरी मका लागवडीला सुरुवात करतात. एक एकरासाठी किमान दोन बॅग (सात ते साडेसात किलो) बियाणे वापरले जाते. म्हणजेच एकरी बियाण्याचा खर्च हा किमान ६०० व कमाल १००० रुपयांपर्यंत वाढल्याचे दिसून येत आहे. एका विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, मक्याच्या बियाण्याचे दर कंपन्यांनी कुठल्या कारणाने वाढवले या बाबत कुणीच बोलत नाही. कंपन्यांचे विक्री प्रतिनिधी याची माहिती नसल्याचे स्पष्ट सांगून मोकळे होत असल्याचे हा विक्रेता म्हणाला.

मक्याचे दर दबावात

खरिपात लागवड केलेल्या मक्याचे पावसाने मोठे नुकसान केलेले आहे. हा मका बाजारात किमान १६०० पासून कमाल २१२५ रुपयांदरम्यान विकतो आहे. गेल्या आठवड्यात तर हा दर १४०० पर्यंत खालावला होता. मका काढणी काळात भिजला. परिणामी, दाण्यांचे नुकसान झाले. ओलाव्याचे प्रमाणही अधिक राहले. यामुळे व्यापारी कमी दरात खरेदी करीत आहेत. दुसरीकडे रब्बीत मका लागवड करण्यासाठी पुढाकार घेत असलेल्या शेतकऱ्यांना बियाण्यासाठी एकरी हजार रुपयांपर्यंत वाढीव खर्च झेलावा लागतो आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com