APMC 'Nandura' : तूर, मका विक्रीसाठी ‘नांदुरा’ ची ओळख

Famous Market Committee of Tur and Maize : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख प्रामुख्याने तूर व मका या शेतमालांसाठी झाली आहे. मिळणारे तुलनात्मक दर व सुविधांमुळे शेतकऱ्यांचा या बाजारपेठेकडे ओढा वाढला आहे.
APMC Nandura
APMC Nandura Agrowon
Published on
Updated on

Success Story of APMC : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुका पूर्वी कापूस उत्पादनात अग्रेसर होता. कालांतराने कपाशीचे क्षेत्र कमी होत गेले. बाजारपेठा व दरांचा विचार करून बहुतांश शेतकरी खरिपात सोयाबीन, तूरतर रब्बीत हरभरा, मका या पिकांना प्राधान्य देत आहे. या पिकांभोवती शेतकऱ्यांचे अर्थकारण फिरताना दिसत आहे.

या शेतमालांपैकी तूर, मका यांच्यासाठी हक्काची बाजारपेठ म्हणून जिल्ह्यातील नांदुरा बाजार समितीची ओळख तयार होत आहे. चांगले दर मिळत असल्याने या बाजार समितीतील आवक देखील सातत्याने टिकून राहात आहे. अन्य भागात विक्रीस जाणारा शेतमाल येथे येतआहे. या विभागात मोठ्या क्षमतेच्या बाजार समित्या असतानाही नांदुरा आपले स्वतंत्र स्थान तयार करण्यात सक्षम ठरते आहे.

तुरीसाठी प्रसिद्ध

केवळ तुरीचा विचार केला तर या बाजार समितीत दरवर्षी एक लाख क्विंटलपेक्षा अधिक उलाढाल होऊ लागली आहे.

मागील तीन वर्षांत त्यास सातत्याने चांगला दर मिळाल्याने आवक एक लाख क्विंटलपेक्षा अधिक झाली. अन्य मोठ्या बाजार समित्यांमध्ये मिळणाऱ्या दरांच्या तुलनेत येथे अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे प्राधान्य या बाजारपेठेस आहे.

APMC Nandura
Agriculture Success Story : बेल्जियम टू नायगाव...

येथून परराज्यात जातो मका

नांदुरा तालुक्यात रब्बी हंगामात मक्याची लागवड दिवसेंदिवस वाढते आहे. तालुक्यात खरिपात दोन हजार हेक्टरपर्यंत तर रब्बीत अडीच हजार हेक्टरपेक्षा त्याची लागवड होऊ लागली आहे. पूर्वी येथे उत्पादित होणारा मका मलकापूर बाजार समितीत विक्रीस नेला जायचा. कालांतराने तो नांदुरा बाजार समितीत येऊ लागला.

आता मक्यासाठी देखील ही बाजार समिती ओळखली जाऊ लागली आहे. गेल्या वर्षी मक्याला उच्चांकी प्रति क्विंटल २४५० रुपयांपर्यंत दर या ठिकाणी मिळाला. येथे खरेदी होणारा मका प्रामुख्याने गुजरातला पाठवला जातो. डेअरी उद्योग, स्टार्च, पोल्ट्री, पशुखाद्यासाठी त्याचा सर्वाधिक वापर होतो. मक्याच्या रूपाने कच्चा माल अधिक प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्याने नांदुरा भागात मक्यापासून आटा तयार करणारे छोटे उद्योगही सुरु होऊ लागले आहेत.

शेतकऱ्यांसाठी सुविधा

पुस्तक अभ्यासिका- शेतकऱ्यांची मुले स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी खात्यात उच्च अधिकारीपदापर्यंत पोचली पाहिजेत यासाठी बाजार समितीतर्फे शेतकरी पुस्तक अभ्यासिका चालवली जात आहे. यात नवनवीन माहिती असलेली पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून दिली जातात.

अभ्यासासाठी जागा, वीज, पाणी आदी सुविधाही मोफत देण्यात येत आहेत. या उपक्रमाचे यश पाहून त्यातील लोकसहभागही वाढला आहे. शेतकऱ्यांना एक रुपयांत पोटभर जेवण, ‘आरओ’ यंत्रणेचे पिण्याचे पाणी, शेतकरी तारण योजना, माल ठेवण्यासाठी शेड, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आदी सुविधाही आहेत. शेतकरी भवन, अतिरिक्त गोदामे, जनावरांचे शेड, डांबरी व सिमेंटचे रस्ते, जुन्या इमारतींची दुरुस्ती आदींपैकी काही प्रस्ताव मार्गी लावण्यात आले आहेत.

APMC Nandura
Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन
नांदुरा बाजार समितीत मागील वर्षी मी विक्री केलेल्या तुरीला सुरवातीस प्रति क्विंटल ७५०० रुपये दर मिळाला. यंदा याच बाजार समितीत दोन टप्प्यांत तूर विक्री केली. सुरवातीस १० हजार रुपये तर नंतरच्या टप्प्यात ११ हजार ६०० रुपये दर मिळाला. अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत हा दर निश्‍चित चांगला होता.
श्रीकृष्ण खोंदले, शेंबा बद्रूक, ता. नांदुरा, जि. बुलडाणा.
या बाजार समितीत ३७ वर्षे व्यापार करीत आहे. सोयाबीन, तूर, हरभरा, मका, ज्वारी आदींना येथे चांगले दर मिळत आहेत. पूर्वी खामगाव, मलकापूर भागात विक्रीस जाणारा शेतमाल नांदुरा येथे विक्रीस येत आहे. मालाची हर्राशी झाल्यानंतर त्वरित मोजमापाला सुरवात होते. त्यामळे शेतकऱ्यांना फार काळ प्रतिक्षा करण्याची गरज भासत नाही. मालाचे चुकारे त्याच दिवशी होतात. बाजारात १५ अडते व तितकेच व्यापारी आहेत.
मनोज राठी, व्यापारी तथा संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, नांदुरा.
पुस्तक अभ्यासिकेचा लाभ घेऊन आत्तापर्यंत १८५ जणांना शासकीय सेवेत जाण्याची संधी मिळाली आहे. दररोज सुमारे दोनशे विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेतात. राज्यातील प्रत्येक बाजार समिती स्तरावर अशा अभ्यासिका सुरु व्हायला हव्यात अशी शेतकरी कन्या-पुत्र अभ्यासिका संघटनेची मागणी आहे.
राजेश गावंडे ७७२०९०६५५६, माजी संचालक, बाजार समिती
अधिकाधिक सुविधा देण्याच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांचा ओढा येथील बाजाराला आहे. त्यांच्या मालाला योग्य दर देण्यासाठी बाजार समिती प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.
भगवान धांडे ८१७७८७५५५५, सभापती, बाजार समिती, आरती घनोकार, सचिव

प्रातिनिधीक उलाढाल

वर्ष : २०२२-२३

शेतमाल आवक (क्विंटल) सरासरी दर (प्रति क्विंटल रू.)

सोयाबीन ६९४१६ ५१८५

मका २८३१० १७८५

तूर १५२९८७ ८६५०

हरभरा २०९०१ ४४११

सन २०२३-२४

सोयाबीन ९३१७० ४२१०

मका १९७५ ६५८००

तूर ११०३१७ ९५००

हरभरा ७६०२४ ५५५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com