Mango Market : वाशी बाजारात दोन दिवस १ लाख आंबा पेट्या आवक

Vashi Mango Market : कोकणच्या हापूसला डझनाला २०० ते ८०० रुपयांचा भाव
Mango Market
Mango MarketAgrowon
Published on
Updated on

Mango Production : वाशी येथील बाजार समितीत सोमवारी (ता. १५) आणि बुधवारी (ता. १७) आंब्याची विक्रमी आवक झाली. दोन्ही दिवशी १ लाखांहून अधिक आंबा पेट्या विक्रीसाठी मार्केटमध्ये दाखल झाल्या. त्यामध्ये ८५ हजार ५६० आणि ६४ हजार ६५६ पेट्या कोकणातील हापूसच्या आहेत.

बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये आंब्याचे राज्य सुरू झाले आहे. रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड, कर्नाटक, तमिळनाडूसह केरळमधून आंबा विक्रीसाठी येत आहेत. या हंगामातील सर्वाधिक आवकेची नोंद सोमवारी (ता. १५) झाली.

फेब्रुवारीपासून पहिल्यांदाच एक लाख पेट्यांचा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून ते सायंकाळपर्यंत कोकणातून ८५,५६० व इतर राज्यांतून ४२,८५० अशा एकूण १ लाख २८ हजार ४१० पेट्यांची आवक झाली. आवक वाढल्यामुळे बाजारभावही कमी झाले आहेत.

Mango Market
Hapus Mango : कोकणातून हापूसच्या ३८० पेट्या वाशी बाजारात

मंगळवारी (ता. १६) ८८ हजार पेटी तर पुन्हा बुधवारी १ लाख २ हजार ८१३ पेट्या आल्या. त्यातील ६४ हजार ६५६ पेट्या हापूसच्या असून ३८ हजार १५७ पेट्या इतर राज्यांतून आल्या. कोकणच्या हापूसला बाजार समितीमध्ये डझनाला २०० ते ८०० रुपयांचा भाव मिळत आहे.

किरकोळ मार्केटमध्ये हापूस डझनाला ४०० ते १२०० रुपये दराने विकला जात आहे. कर्नाटकमधील हापूससदृश आंबा ७० ते १३० रुपये किलो, बदामी ४० ते ६०, तोतापुरी २५ ते ३०, लालबाग ३० ते ६०, गोळा ३५ ते ४० रुपये किलो दराने विकला जात आहे.

या महिन्याच्या अखेरपर्यंत आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. नागरिकांना जूनअखेरपर्यंत आंबा उपलब्ध होणार आहे. आंब्याचे दरही नियंत्रणात असल्यामुळे आंबा खरेदीसाठी हीच योग्य वेळ असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.

याबाबत बाजार समितीचे संचालक संजय पानसरे म्हणाले, की आंब्याची आवक वाढल्यामुळे दर स्थिर ठेवण्याचे आव्हान आहे. त्यामुळे यंदा नवनवीन बाजारपेठा शोधत आहोत. पंजाब, राजस्थानसह, पश्‍चिम बंगालमधील काही भागांमध्ये आंबा विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे.

उन्हामुळे तोड वाढली
कोकणातील बागायतदारांकडून मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीला पाठविला जात असला तरीही हा जोर मेच्या पहिल्या पंधरवड्यात कमी राहील, असा अंदाज आहे. उष्मा वाढल्यामुळे आंबा लवकर तयार होत आहे. उन्हामुळे तयार झालेल्या फळाची तोड केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com