Chana Market: काबुली हरभऱ्याचे भाव तेजीतच राहण्याचा अंदाज

Kabuli Chana Rate : देशात मागील रब्बी हंगामात काबुली हरभऱ्याचे उत्पादन घटले होते. आयातही गजरजेपेक्षा कमी झाली. यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत वाढून भाव वाढले होते.
Kabuli Chana Market Rate
Kabuli Chana Market RateAgrowon
Published on
Updated on

Pune News : देशात मागील रब्बी हंगामात काबुली हरभऱ्याचे उत्पादन घटले होते. आयातही गजरजेपेक्षा कमी झाली. यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत वाढून भाव वाढले होते. देशातील परिस्थिती पाहता देशात काबुली हरभऱ्याचे भाव पुढील काळातही तेजीतच राहण्याचा अंदाज आहे.

काबुली हरभऱ्याच्या भावात मागील काही दिवसांपासून चढ उतार दिसून येत आहेत. वाढलेल्या भावात काबुली हरभऱ्याची मागणीही कमी झालेली दिसते. पण सणांच्या काळात

काबुली हरभऱ्याला मागील काही दिवसांपासून मागणी वाढली त्यामुळे काबुली हरभऱ्याच्या भावात काहिशी सुधारणाही दिसून आली. मागील तीन महिन्यांचा आढावा घेतला की लक्षात येत की, काबुली हरभऱ्याच्या भावात सतत चढ उतार दिसले होते. पण मागील एक महिन्यापासून काबुली हरभऱ्याचे भाव ९ हजार ते १० हजारांच्या दरम्यान स्थिरावले होते. मात्र मागणी वाढल्याने काबुली हरभऱ्याच्या भावात पुन्हा वाढ झाली.

Kabuli Chana Market Rate
Kabuli Chana : अकोल्यात पांढरा हरभरा १० हजार २०० रुपये क्विंटल

देशात जेव्हा देशी हरभऱ्याचे भाव दबावात होते, शेतकऱ्यांना कमी भावात माल विकावा लागला, म्हणजेच शेतकऱ्यांना हमीभावही मिळाला नाही, त्या काळात काबुली हरभऱ्याचे भाव चांगले होते. काबुली हरभऱ्याची सरासरी भावपातळी मागणी काही महिन्यांपासून कायम आहे. त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामात यंदा काबुली हरभऱ्याला पसंती देऊ शकतात, असा अंदाज आहे.

Kabuli Chana Market Rate
Chana Crop Variety : हरभरा लागवडीसाठी कोणते वाण निवडाल?

उत्पादनात घट

देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन घटले होते. काबुली हरभऱ्याला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळं उत्पादकता कमी राहीली. सरत्या हंगामात काबुली हरभऱ्याचे उत्पादन ४ लाख टनांच्या आतच स्थिरावले.

त्यामुळे बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत गेली. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या बाजारांमध्ये काबुली हरभरा आवक मोठ्या प्रमाणात कमी होत आहे.

भाव काहिसे वाढले

जागतिक बाजारातही काबुली हरभरा आता भाव खाताना दिसतो. भाव वाढल्याने स्टाॅकीस्टही हळूहळू माल बाजारात आणताना दिसत आहेत. सध्या काबुली हरबऱ्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान भाव आहे.

तर कमाल भाव १४ हजारांवर पोचला. काबुली हरभऱ्याचे भाव पाहून यंदाच्या रब्बी हंगामात लागवड वाढीची शक्यता आहे. काबुली हरभऱ्याचे भाव मात्र आणखी काही महिने तेजीतच राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com