Kabuli Chana : अकोल्यात पांढरा हरभरा १० हजार २०० रुपये क्विंटल

Chana Market : या भागातील काही शेतकरी पांढऱ्या हरभऱ्याची लागवड करतात. हा हरभरा इतर हरभऱ्यापेक्षा अधिक दर मिळवितो.
Kabuli Chana
Kabuli Chana Agrowon
Published on
Updated on

Akola News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा (पांढरा) चांगले दर मिळवत आहे. शनिवारी (ता. १६) बाजारात हा हरभरा सरासरी १० हजार २१२ रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला. त्यास किमान दर ६ हजार १०० व कमाल दर १४ हजार ३२५ रुपये मिळाला, तर १४ क्विंटलची आवक झाली.

या भागातील काही शेतकरी पांढऱ्या हरभऱ्याची लागवड करतात. हा हरभरा इतर हरभऱ्यापेक्षा अधिक दर मिळवितो. साधारण हरभरा हा किमान ४६७५ व कमाल ५९२५ रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला. सरासरी ५३४५ रुपयांचा दर होता. सुमारे २५०० क्विंटलची आवक झाली.

Kabuli Chana
Chana Market : अकोल्यात हरभऱ्याचा सरासरी दर ५३०० रुपये

तुरीला सरासरी १० हजार रुपये

गेल्या काही दिवसांपासून येथील बाजारात तुरीचा दर वधारलेला आहे. शनिवारी तूर सरासरी १० हजार रुपये क्विंटलने विक्री झाली. तुरीला किमान ६५०० व कमाल ११६५० रुपयांचा दर मिळाला, तर २७७ क्विंटलची आवक झाली. शुक्रवारी (ता.१५) तुरीचा भाव ८९०० ते ११ हजार ८०५ रुपयांदरम्यान होता.

Kabuli Chana
Chana Market : हरभरा दरात काहीशी नरमाई; सणांची मागणी असूनही दरात चढ उतार का सुरु झाले?

मागील आठवड्यात तुरीचा कमाल दर १२ हजारांपर्यंत पोहोचला होता. ९ सप्टेंबरला ८००५ रुपये किमान, तर १२ हजार ५५ रुपये कमाल दर होता. आता कमाल दरात थोडी घसरण झाली आहे. यंदाच्या हंगामात तुरीच्या पिकाचे लागवडीनंतर वाळवीने मोठे क्षेत्र बाधित झाले.

ऑगस्टमध्ये महिनाभर पावसाचा खंड पडल्याने वाढीवर परिणाम झाला. त्यामुळे यंदा तुरीचेही या भागात उत्पादन कमी राहण्याची शक्यता आतापासून वर्तविली जात आहे. त्यामुळे तुरीचा दर बाजारात टिकून राहण्याबाबत खरेदीदार आतापासून अपेक्षा व्यक्त करू लागले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com